कणकवलीत नीतेश राणे यांची पाच तास चौकशी; त्यानंतर पोलिसांनी गोव्याच्या दिशेने नेले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:28 AM2022-02-04T08:28:13+5:302022-02-04T08:28:41+5:30

परब हल्लाप्रकरणी नीतेश बुधवारी शरण आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

Five hours interrogation of BJP MLA Nitesh Rane in Kankavali | कणकवलीत नीतेश राणे यांची पाच तास चौकशी; त्यानंतर पोलिसांनी गोव्याच्या दिशेने नेले

कणकवलीत नीतेश राणे यांची पाच तास चौकशी; त्यानंतर पोलिसांनी गोव्याच्या दिशेने नेले

Next

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी  आमदार नीतेश राणे यांना अधिक तपासासाठी  सावंतवाडी येथून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत म्हणजे पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर नीतेश यांना गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे कोणत्या मुद्द्यांबाबत चौकशी केली याबाबतचा तपशील समजू शकला नाही.

परब हल्लाप्रकरणी नीतेश बुधवारी शरण आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
आमदार राणे यांचा ताबा कणकवली पोलिसांकडे देण्यात आला होता. बुधवारी रात्री ओरोस जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना सावंतवाडी येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा चौकशीसाठी त्यांना कणकवली ठाण्यात आणण्यात आले. यावेळी नीतेश व त्यांचे स्वीय सहायक राकेश परब यांची कणकवली पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली.

गोव्याच्या दिशेने नेले-

नीतेश यांना कणकवली पोलीस स्थानकातून गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. त्यामागचे नेमके कारण समजत नाही. परब हल्ल्याचा कट पुण्यात रचला गेला, अशी माहिती समोर येत होती, पण तपासाचा एक भाग म्हणून राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी गोव्यात नेले असल्याची शक्यता आहे. राणे कुटुंबीयांच्या गोवा कळंगुट येथील हॉटेलवर चौकशीसाठी त्यांना नेण्यात आल्याचे समजते.

Web Title: Five hours interrogation of BJP MLA Nitesh Rane in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.