दागिने पॉलिशप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 02:46 PM2019-12-20T14:46:28+5:302019-12-20T14:47:31+5:30

विलवडे, ओटवणे गावात जाऊन एकमेकांच्या संगनमताने लोकांचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याने पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Five people charged for jewelry polishing | दागिने पॉलिशप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

दागिने पॉलिशप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देदागिने पॉलिशप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखलसोन्याची माळ लंपास केल्याचे सिद्ध

बांदा : विलवडे, ओटवणे गावात जाऊन एकमेकांच्या संगनमताने लोकांचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याने पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन बिहारी तरुणांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच ओटवणे ग्रामस्थांनी तिघांना पकडून दिले होते. पाचजणातील दोघांनी आठ दिवसांपूर्वी विलवडे - मळावाडी येथील सुनिता पांडुरंग दळवी यांची सोन्याची माळ लंपास केल्याचे सिद्ध झाले.

गौरवकुमार संजितकुमार साह (रा. प्रोफेसर कॉलनी, नौगाछिया, जि. भागलपूर) , मदन गंगा भगत (रा. यामूनीया, यामुनीया परवत्ता, जमूनीया एरिया साहू, भागलपूर) , राहुलराज अनिल साहू (रा. उदाकिशनगंज, जि. मधेपुरा), मोहम्मद सपुरुद्दीत मोहम्मद नफिल कुंजारा (रा. मोहनपूर, अंजरी, भूआ परबल जि. पुर्णिया) नंदनकुमार दशरत सहा थटेरा (रा. जमुनिया, तुलसीपुर चौक, जि. भागलपूर) अशी ५ भामट्यांची नावे असून सर्व बिहार राज्यातील आहेत.

अस्मिता चंद्र्रकांत दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन यातील दोघांविरुद्ध बांदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली.

Web Title: Five people charged for jewelry polishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.