परमे नदीपात्रात पाचजण बुडाले

By admin | Published: May 30, 2014 12:53 AM2014-05-30T00:53:14+5:302014-05-30T00:55:21+5:30

एकाला वाचविले : चौघे एकाच कुटुंबातील

Five people fell into the river's river bed | परमे नदीपात्रात पाचजण बुडाले

परमे नदीपात्रात पाचजण बुडाले

Next

दोडामार्ग : परमे हत्तीचा गुंडा येथे तिलारी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहाजणांपैकी पाचजण नदीपात्रातील पाण्यात बुडाले. यातील एकाला वाचविण्यात यश आले. ही घटना सायंकाळी ६.३0 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, एकाच कुटुंबातील चारजणांवर काळाने घातलेल्या घाल्याने तेथील परिस्थिती हृदयद्रावक अशीच होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की, परमे हत्तीचा गुंडा येथे तिलारी नदीपात्रात आंघोळीसाठी तेथीलच अर्जुन आरोसकर हे आपल्या दोन मुलगे, एक मुलगी व भाचा व भाचीला घेऊन असे एकूण सहाजण नदीपात्रात गेले होते. यावेळी आंघोळ करुन नदीपात्रातून बाहेर पडत असताना अरुणा अर्जुन आरोसकर हिचा पाय घसरल्याने ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीपात्रात वाहू लागली. या प्रकारामुळे भांबावलेल्या इतरांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तेही वाहून गेले. यावेळी अर्जुन आरोसकर यांनी नदीकाठच्या बांबूच्या काठीच्या सहाय्याने अक्षता अंकुश गवस (१५) या आपल्या भाचीला बाहेर काढले. मात्र, स्वत:ची मुले व भाच्याला वाचविण्यात त्यांना अपयश आले. बुडालेल्या मुलांमध्ये परमे येथील रहिवासी अर्जुन आरोसकर यांचा मुलगा आकाश आरोसकर (१८), अक्षय आरोसकर (१७) व अरुणा आरोसकर (२१) यांच्यासह त्यांच्या पिकुळे येथील बहिणीचा मुलगा अंकीत अंकुश गवस (१८) यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. बाभळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक गावीत, आर.डी. कदम व विजय कांबळी शोधकार्य करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Five people fell into the river's river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.