Sindhudurg: शिकारीसाठी निघालेल्या पाच जणांना खारेपाटण येथे घेतले ताब्यात, कणकवली पोलिसांची कारवाई

By सुधीर राणे | Published: May 31, 2024 12:24 PM2024-05-31T12:24:58+5:302024-05-31T12:25:37+5:30

काडतुसची बंदूक, काडतुसे, कार जप्त.

Five persons who went for hunting were detained in Kharepatan, Kankavali police action | Sindhudurg: शिकारीसाठी निघालेल्या पाच जणांना खारेपाटण येथे घेतले ताब्यात, कणकवली पोलिसांची कारवाई

Sindhudurg: शिकारीसाठी निघालेल्या पाच जणांना खारेपाटण येथे घेतले ताब्यात, कणकवली पोलिसांची कारवाई

कणकवली: देवगड तालुक्यातील मुटाट येथून राजापूरच्या दिशेने शिकारीच्या उद्देशाने जात असताना  पाच जणांना कणकवली पोलिसांनी खारेपाटण तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून काडतुसच्या बंदुकीसहित जिवंत काडतुसे व प्रवासासाठी वापरलेली कार असा ६ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  त्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आरोपी एका कारमधून देवगड येथून राजापूरच्या दिशेने जात होते. संशय आल्याने खारेपाटण पोलिस तपासणी नाका या ठिकाणी  त्यांच्या गाडीची तपासणी करण्यात आली.  या गाडीमध्ये देवगड तालुक्यातील संशयित आरोपी जितेंद्र बाबाजी पाळेकर (४०,रा. मुटाट पाळेकरवाडी), गोपाळ लक्ष्मण पाळेकर (५४, रा. मुटाट, पाळेकरवाडी), विसंगत विश्वास साळुंखे (३१,रा. मुटाट, बौद्धवाडी), विनोद राजाराम साळुंखे (३६,रा. मुटाट, बौद्धवाडी), संतोष सखाराम पाळेकर (५०,रा. मुटाट, पाळेकरवाडी) हे पाचजण होते. 

या संशयित आरोपींकडून २० हजार रुपये किमतीची काडतुसांची बंदूक, ५ जिवंत काडतुसे, ७०० रुपयाची हेडलाईट, आकाशी रंगाचे कव्हर व ६ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण ६ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.तसेच त्यांना विनापरवाना काडतुसची बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने जात असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, विनोद चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

Web Title: Five persons who went for hunting were detained in Kharepatan, Kankavali police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.