CoronaVirus In Sawantwadi : कुटिर रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर सुरू : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 05:49 PM2021-05-13T17:49:27+5:302021-05-13T17:51:20+5:30

CoronaVirus In Sawantwadi Sindhudurg : सावंतवाडी येथील कुटिर रुग्णालयात सात व्हेंटिलेटरची सोय करण्यात आली आहे. त्यातील पाच व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले असून ऑक्सिजन मिळेल तसे आणखीन बेड सुरू होतील,अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बांदा येथील तालुका क्रीडांगण इतरत्र कुठेही हलविण्यात आले नाही लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, असे आवाहनही केसरकर यांनी केले.

Five ventilators started in Kutir Hospital: Kesarkar | CoronaVirus In Sawantwadi : कुटिर रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर सुरू : केसरकर

CoronaVirus In Sawantwadi : कुटिर रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर सुरू : केसरकर

Next
ठळक मुद्देकुटिर रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर सुरू : केसरकरगैरसमज पसरवू नका, असे केसरकर यांनी केले आवाहन

सावंतवाडी : येथील कुटिर रुग्णालयात सात व्हेंटिलेटरची सोय करण्यात आली आहे. त्यातील पाच व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले असून ऑक्सिजन मिळेल तसे आणखीन बेड सुरू होतील,अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बांदा येथील तालुका क्रीडांगण इतरत्र कुठेही हलविण्यात आले नाही लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, असे आवाहनही केसरकर यांनी केले.

सावंतवाडीतील कुटिर रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरून सावंतवाडीचे नगराध्यक्ष यांनी केसरकर यांच्या टीका केली होती या टीकेला उत्तर देण्यापूर्वीच रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले असून हेच माझे कामातून उत्तर असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडीत एका कोरोना सेंटरमध्ये मृतदेह पाच तास ठेवण्यात आला. त्याची चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले तर बांदा येथील तालुका क्रीडांगण इतरत्र कुठेही हलविण्यात आले नसून त्याचे राजकारण कोणीही करू नये, असा सल्ला केसरकर यांनी दिला तसेच क्रीडांगण बांदा येथेच होणार असल्याचे स्पष्ट केले.

कुटिर रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरून नगराध्यक्ष संजू परबांनी यांनी टीका करण्यापूर्वी माझ्याशी बोलणे गरजेचे होते. ऑक्सिजन पुरवठा करणारी लाईन बंद पडल्याने ही समस्या निर्माण झाली होती, असे त्यांनी सागितले. ही लाईन सुरू करण्यात आली आहे, असे स्पष्ट केले.

Web Title: Five ventilators started in Kutir Hospital: Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.