रत्नागिरी तालुक्यात पाच गावांत वृक्षलागवड
By admin | Published: June 4, 2015 11:22 PM2015-06-04T23:22:12+5:302015-06-05T00:18:40+5:30
. मुंडे यांच्या स्मरणार्थ शासनाने ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त वृक्षलागवडीचा कार्यक्रम
रत्नागिरी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित पर्यावरण सप्ताहअंतर्गत रत्नागिरी पंचायत समितीतर्फे तालुक्यातील पाच गावांमध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला. ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत पाच गावांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यात आली. मुंडे यांच्या स्मरणार्थ शासनाने ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी पंचायत समितीतर्फे आज तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या पाच ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. ९ जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेत वृक्षलागवड करण्यात येणार असल्याने यंदा हा भाग वृक्ष लागवडीखाली येणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ जलशिवारमधून ही लागवड करण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा या मोहिमेत समावेश असल्याने त्या परिसरात वृक्ष लागवड होणार आहे.
यामध्ये चाफे, नाणीज, वरवडे, पिरंदवणे आणि खेडशी या पाच ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक शाळांची ठिकाणे, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, समाज मंदिर, गावठाण, गायरान, शासकीय निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन व रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी आवश्यक ती रोपे सामाजिक वनीकरण विभागामार्फत पुरविण्यात आली आहेत. दरम्यान, पाच गावांत पार पडलेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी जी. डी. साखरे, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी शंकर घुले, श्रीमती शिरधनकर, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी सकपाळे, सुर्वे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)