कनेडी राड्यातील भाजप, शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना पुन्हा अटक; आज न्यायालयात हजर करणार

By सुधीर राणे | Published: February 14, 2023 01:50 PM2023-02-14T13:50:45+5:302023-02-14T13:51:20+5:30

कनेडी येथील राड्याप्रकरणी भाजप व शिवसेनेच्या ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे

Five workers of BJP, Shiv Sena arrested again in Kandy Rada; Will appear in court today | कनेडी राड्यातील भाजप, शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना पुन्हा अटक; आज न्यायालयात हजर करणार

कनेडी राड्यातील भाजप, शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना पुन्हा अटक; आज न्यायालयात हजर करणार

googlenewsNext

कणकवली : कनेडी येथे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडाप्रकरणी सध्या भा. दं. वि. कलम ३०७ च्या गुन्हयांतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांपैकी चौघांना कणकवली पोलिसांनी कलम ३५३ च्या गुन्ह्यांतर्गत सोमवारी अटक केली. यावेळी ३५३ च्या गुन्ह्यांतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाला ३०७ च्या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली. पाचही संशयितांना आज (मंगळवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

कलम ३५३ व अन्य कलमांतर्गत अटक केलेल्यांमध्ये भाजपचे श्रीकांत उर्फ कांता नारायण सावंत (५०, भिरवंडे-बिवणेवाडी), राजेश मधुकर पवार (५१, दिगवळे- करंबळीवाडी), निखिल प्रकाश आचरेकर (३९, कणकवली- मारुतीआळी), शिवसेनेचे मंगेश रामचंद्र सावंत (४८, भिरवंडे- पुनाळवाडी) यांचा समावेश आहे. तर भा.दं.वि. कलम ३०७ व अन्य कलमांतर्गत संदीप बाळकृष्ण गावकर (३२, सांगवे-गावकरवाडी) याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, कनेडी येथील राड्याप्रकरणी पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार भाजप व शिवसेनेच्या  ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे. त्यातील दहा जणांना अटक झाली असून इतरांना कधी अटक होणार? याची उत्सुकता नागरिकांना आहे.

Web Title: Five workers of BJP, Shiv Sena arrested again in Kandy Rada; Will appear in court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.