सिंधुदुर्गात आरोग्य सेवेत त्रुटी; स्थानिक आमदारांनी मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष द्यावे - परशुराम उपरकर

By सुधीर राणे | Published: October 4, 2023 01:28 PM2023-10-04T13:28:09+5:302023-10-04T13:28:48+5:30

नांदेड व छत्रपती संभाजीनगर मध्ये आरोग्य सेवेतील त्रुटींमुळे जी दुर्घटना झाली तशीच अवस्था सिंधुदुर्गात होण्याची वेळ 

Flaws in health care in Sindhudurga; Local MLAs should focus on constituency issues - Parashuram Uparkar | सिंधुदुर्गात आरोग्य सेवेत त्रुटी; स्थानिक आमदारांनी मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष द्यावे - परशुराम उपरकर

सिंधुदुर्गात आरोग्य सेवेत त्रुटी; स्थानिक आमदारांनी मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष द्यावे - परशुराम उपरकर

googlenewsNext

कणकवली: नांदेड व छत्रपती संभाजीनगर मध्ये आरोग्य सेवेतील त्रुटींमुळे जी दुर्घटना झाली तशीच अवस्था सिंधुदुर्गात होण्याची वेळ आली आहे. असा आरोप करतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच इतर लोकप्रतिनिधी 'आपला दवाखाना' सुरू करण्याबाबत घोषणा करतात. त्याचे उदघाटन करतात. पण तिथे आवश्यक औषध पुरवठा होतो का ?  जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४१ डॉक्टरची पदे रिक्त आहेत. वर्ग ३ आणि वर्ग ४ ची पदे भरलेली नाहीत,अशी स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक आमदार वैभव नाईक, आणि नितेश राणे यांनी राज्यातील विषयांवर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे आधी लक्ष द्यावे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.परशुराम उपरकर म्हणाले, १० अधिपरीचारिकांची पदे मंजूर असतानाही केवळ ३ अधिपरीचारिका देवगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत. कामाच्या अति ताणामुळे त्या अधिपरीचारिका संपावर जाणार आहेत. ही लज्जास्पद बाब आहे.

जिल्ह्याचे एक सुपुत्र केंद्रीयमंत्री तर दोघे राज्यात  मंत्री असूनही जिल्ह्याची आरोग्यसेवा सुधारू शकत नाहीत. तर आता विरोधी पक्षात असलेले खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी सत्तेत असताना  १६०० कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या घोषणेचे काय झाले ? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  घाईगडबडीत सुरू करून  एमबीबीएस शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे. त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक तसेच इतर सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे. 

सिंधुदुर्गातील शासकीय आरोग्य सेवेची स्थिती पाहता जनता आता लोकप्रतिनिधींच्या फसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही. येत्या निवडणुकीत त्यांना निश्चितच धडा शिकवेल. मात्र, शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे श्रेय घेण्यात लोकप्रतिनिधी  गुंतलेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील आरोग्य सेवेबाबत वेळीच दखल न घेतल्यास नांदेड सारखी घटना घडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जनतेने जागरूक रहावे,असे आवाहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले. 

Web Title: Flaws in health care in Sindhudurga; Local MLAs should focus on constituency issues - Parashuram Uparkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.