पूरपरिस्थितीचा दोन हजार शेतकऱ्यांना फटका
By admin | Published: January 4, 2017 09:48 PM2017-01-04T21:48:42+5:302017-01-04T21:48:42+5:30
अरूण नातूंची माहिती : बाधित क्षेत्राचा अहवाल राज्य शासनास सादर
सिंधुदुर्गनगरी : जुलै ते आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० गावांतील १९८९ शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेती, फळपीक व शेतजमीन असे मिळून २६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी या बाधित क्षेत्राचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनास पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा व कृषी अधीक्षक विभागाचे कृषी यांत्रिकी अधिकारी अरुण नातू यांनी दिली.
जुलै ते आॅक्टोबरदरम्यान सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. याचा फटका भातशेतीबरोबरच फळपीक व जमिनीलाही बसला होता. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला एक पत्रक जारी करून तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत ५० टक्के किंवा त्यावरील नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तो अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)
जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत शासन निर्देशाच्या अधीन राहून अहवाल दिल्याची सूचना केली होती. त्यानुसारच अहवाल प्राप्त होऊन त्यामध्ये
जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा १६० गावांना फटका बसला असून
१९८९
शेतकरीबाधित झाले आहेत. त्यांचे एकूण २६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची नोंद यात करण्यात आली आहे.
शेतीपिकाच्या नुकसानीचा जास्तीचा समावेश असून या पिकाचे
२६१.१ हेक्टर क्षेत्र एवढे नुकसान झाले आहे. तर त्याची शेतकरी संख्या १९५८ एवढी आहे.
फळपिकामध्ये १४ गावांतील २७ शेतकऱ्यांचे १ हेक्टर ३१ गुंठे एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. तर
२ गावांतील
४ शेतकऱ्यांमध्ये ५० गुंठे क्षेत्र वाहून गेले आहे.
मार्चपर्यंत मदतीची शक्यता
चार महिन्यांच्या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीत बाधित झालेल्या क्षेत्राचा अहवाल संयुक्त स्वाक्षरीने राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. हा अहवाल मंजूर होऊन साधारणत: मार्च महिन्यापर्यंत नुकसान भरपाईपोटी निधी मिळण्याची शक्यता आहे.
देवगड, मालवण, कुडाळ नुकसानी नाही
राज्य शासनाच्या कृषी विभागमार्फत करण्यात आलेल्या नुकसानीच्या अहवालात देवगड, मालवण व कुडाळ या
तीन तालुक्यांमध्ये जुलै ते आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तालुकाबाधित शेतपिकेफळपिकेजमिनीचे नुकसान
कणकवली२२.६ हेक्टर९५ गुंठे-
वैभववाडी१३.२८ हेक्टर१ गुंठा५७ गुंठे
सावंतवाडी४.७३ हेक्टर२३ गुंठे-
दोडामार्ग३५.६ हेक्टर--
वेंगुर्ला१८५ हेक्टर--
एकूण२६१.२१ हेक्टर११९ गुंठे५७ गुंठे