कणकवलीत उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच काही भाग कोसळला, नागरिक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 11:34 AM2020-07-31T11:34:33+5:302020-07-31T11:39:29+5:30
ड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच त्यावर काँक्रीट ओतत असतांना उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला.
Next
कणकवली - मुंबई गोवा महामार्गावर हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या निकृष्ट कामाचा पुन्हा एक नमुना शुक्रवारी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाल्याचे दिसून आले आहे .
उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच त्यावर काँक्रीट ओतत असतांना उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. काँक्रीटचा लोड स्टील ने घेतला नसल्याने हे पूल कोसळले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. मात्र जीवितहानी झाल्यावरच ठेकेदार सुधारणार का ? शहरातील उड्डाणपुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काय झाले ? असे विविध प्रश्न कणकवलीवासीय व्यक्त करत तीव्र संताप झाल्याचे दिसून येत आहेत.