आघाडी रोखण्यासाठी सेना-भाजप युती?

By admin | Published: December 15, 2015 09:49 PM2015-12-15T21:49:31+5:302015-12-15T23:33:55+5:30

पालिका पोटनिवडणूक : रत्नागिरीत जुन्या इतिहासाची नांदी

Force-BJP alliance to stop the alliance? | आघाडी रोखण्यासाठी सेना-भाजप युती?

आघाडी रोखण्यासाठी सेना-भाजप युती?

Next

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग २ (अ)मध्ये एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा आखाडा तापला आहे. राष्ट्रवादीचे केतन शेट्ये व सेनेचे राजन शेट्ये आमने-सामने उभे ठाकणार आहेत. ही पोटनिवडणूक सेना व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची बनवली आहे. सेना - भाजपमध्ये वितुष्ट असताना युतीचा प्रस्ताव सेनेकडून भाजपला देण्यात आला आहे. राष्ट्रवादी व कॉँग्रेसमध्ये समझोत्याची शक्यता आहे. त्यामुळे युती व आघाडी अशी ही निवडणूक होणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष वेधले असून, ही पोटनिवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नगरपरिषदेच्या प्रभाग २ व ४मध्ये १ नोव्हेंबर २०१५ रोजी चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळीही सेना व राष्ट्रवादीमध्येच लढाई जुंपली होती. त्यात दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोना जागांवर विजय मिळवता आला. त्या पोटनिवडणुकीआधी सेनेत नगरसेवक असलेले उमेश शेट्ये यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळेच प्रभाग २ (अ)मधील ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी १० जानेवारी २०१६ रोजी पोटनिवडणूक होत असून, राष्ट्रवादीत प्रवेश केलेले उमेश शेट्ये यांचे पुत्र केतन शेट्ये या प्रभागातून राष्टवादीतर्फे निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेतर्फे आमदार उदय सामंत यांचे कट्टर समर्थक राजेश सावंत यांची उमेदवारी आधी जाहीर झाली होती. त्यानुसार त्यांनी प्रभागातील मतदारांशी संपर्कही साधला. त्यांना विजयी करण्याबाबतचे आवाहनपत्रही वितरित करण्यात आले. मात्र, त्यांचा नगरपरिषदेच्या एका कंत्राटाशी संबंध असल्याने आक्षेप घेणे सुरू झाले. एक ठेका जो रद्द करण्याची मागणी करूनही रद्द झाला नाही, असा आरोप याबाबत राजेश सावंत यांनी केला आहे. त्यानंतर या जागेवर सेनेचेच राजन शेट्ये यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राजन शेट्ये व उमेश शेट्ये हे एकेकाळचे खास मित्र! मात्र नंतर राजकीय वादावादीत त्यांचे बिनसले व सध्या त्यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. गेल्या वेळी याच प्रभागात उमेश शेट्ये यांनी राजन शेट्ये यांच्या घरच्या राजकीय मैदानातच त्यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी राजन शेट्ये हे अधिक जोरकसपणे प्रचारात गुंतले आहेत. कोणत्याही स्थितीत ही पोटनिवडणूक जिंकायचीच, असा चंग त्यांनी बांधला आहे. त्यांना आमदार उदय सामंत यांचा पूर्ण पाठिंबा आहे. तसेच आमदार सामंतही राजन शेट्ये यांच्या विजयासाठी सर्वते प्र्रयत्न करणार हे स्पष्ट झाले आहे. २०१६मध्ये होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये हे जड जाता नयेत, अशी व्यूहरचना सुरू आहे. त्यामुळेच विश्वासातील असलेले माजी नगरसेवक राजन शेट्ये यांच्या विजयासाठी सामंत जोरकस प्रयत्न करीत आहेत.
दुसरीकडे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक असलेले उमेश शेट्येही कामाला लागले आहेत. आम्ही काय कच्च्या गुरूचे चेले नाहीत, असे बजावतच त्यांनी राजकीय सारीपाटावरील सोंगट्यांची हालवाहालव सुरू केली आहे. केतन शेट्ये यांना विजयी करण्याचा त्यांनी विडाच उचलला आहे. (प्रतिनिधी)


सेनेतर्फे राजन शेट्ये : केतन शेट्येंचा अर्ज
प्रभाग २ (अ)मधील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी राष्ट्रवादीतर्फे केतन शेट्ये यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांच्याडे दाखल केले. कौसल्या शेट्ये यांचाही डमी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी सहनिवडणूक अधिकारी एम. बी. खोडके तसेच नगरसेवक उमेश शेट्ये, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. सेनेतर्फे राजन शेट्ये यांचा उमेदवारी अर्ज १६ डिसेंबरला दाखल होणार आहे. कॉँग्रेसकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होणार की, कॉँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देणार? भाजपही सेनेच्या युतीच्या प्रस्तावाला मान्यता देणार काय, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Force-BJP alliance to stop the alliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.