Corona vaccine Sindhudurg- कोविड लसीकरणात पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 10:45 AM2021-04-05T10:45:05+5:302021-04-05T10:49:06+5:30

Corona vaccine Sindhudurg- कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४५० पोलिसपाटलांची कोविड १९ च्या लसीकरणासाठी अद्याप ऑनलाईन नोंदणीच करण्यात आलेली नाही . त्यामुळे पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर पडला की काय ? असा सवाल पोलिसपाटलांकडून केला जात आहे . तर प्रशासनाच्या या कारभाराबाबत संघटनेकडून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.

Forget the police administration in covid vaccination | Corona vaccine Sindhudurg- कोविड लसीकरणात पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर

Corona vaccine Sindhudurg- कोविड लसीकरणात पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर

Next
ठळक मुद्देकोविड लसीकरणात पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर लसीकरणासाठी नोंदणी नाही; संघटनेकडून नाराजी व्यक्त

कणकवली : कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४५० पोलिसपाटलांची कोविड १९ च्या लसीकरणासाठी अद्याप ऑनलाईन नोंदणीच करण्यात आलेली नाही . त्यामुळे पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर पडला की काय ? असा सवाल पोलिसपाटलांकडून केला जात आहे . तर प्रशासनाच्या या कारभाराबाबत संघटनेकडून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.

खेड्यापाड्यात लॉकडाऊनकाळात कसलीही सुरक्षेची साधने नसताना कोरोना बाधित रूग्णांना सक्तीने संस्थात्मक क्वारंटाईन करणे , पुणे , मुंबईहून आलेल्या लोकांची तपासणी करून घेणे , त्यांचे विलगीकरण करून घेणे , संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे , त्याची माहिती महसूल , पोलिस आणि आरोग्य प्रशासनास रोजच्या रोज देणे अशी कामे पोलिसपाटलांनी केली .

काही गावात कोरोनाचा प्रवेश होवू न देण्यातही पोलीस पाटलांचा मोठा वाटा होता. अजूनही पोलिसपाटील आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत . असे असताना कोविड लसीकरणात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . अंगणवाडी कर्मचारी , आशा वर्कर्स , शिक्षक , पोलिस यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

परंतु प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पोलिस पाटलांचा मात्र प्रशासनाला विसर पडल्याची भावना पोलिसपाटलांमध्ये निर्माण झाली आहे . दरम्यान , याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे सचिव अनंत राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाचे लसीकरणाबाबत लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.
 

Web Title: Forget the police administration in covid vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.