माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 03:47 PM2020-10-05T15:47:23+5:302020-10-05T15:50:32+5:30
Narayan Rane, coronavirus, sindhudurgnews माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी कोरोनावर पूर्णतः मात केली आहे.लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते मुंबई येथील आपल्या अधीश निवासस्थानी परतले आहेत.
Next
ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची कोरोनावर मात हितचिंतकांचे राणे यांनी मानले आभार
कणकवली : माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी कोरोनावर पूर्णतः मात केली आहे.लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते मुंबई येथील आपल्या अधीश निवासस्थानी परतले आहेत.
नारायण राणे यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त कळताच त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून राज्यभरातून कार्यकर्ते , हितचिंतक यांचेकडून शुभेच्छा दिल्या जात होत्या.त्या सर्व हितचिंतकांचे राणे कुटूंबाच्यावतीने माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत.