गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजपकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 05:56 PM2021-05-10T17:56:11+5:302021-05-10T17:59:03+5:30

CoronaVirus Sindhudurg Goa : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला काही ऑक्सिजन सिलेंडर दिले. त्यामुळे काँग्रेसचे नेते गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे कणकवली तालुका भाजपच्यावतीने कामत यांचा सोमवारी निषेध करण्यात आला.

Former Goa Chief Minister Digambar Kamat protested by BJP | गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजपकडून निषेध

कणकवली येथे भाजप कार्यकर्त्यांकडून गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा सोमवारी निषेध करण्यात आला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देगोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजपकडून निषेध कणकवली कार्यालयासमोर निदर्शने

कणकवली : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला काही ऑक्सिजन सिलेंडर दिले. त्यामुळे काँग्रेसचे नेते गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे कणकवली तालुका भाजपच्यावतीने कामत यांचा सोमवारी निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपा कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलींद मेस्त्री, भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, कळसुली बूथ अध्यक्ष सचिन पारधिये,नागवे बूथ अध्यक्ष सचिन खेडेकर, कणकवली बूथ अध्यक्ष प्रवीण पाटील, संजय ठाकूर उपस्थित होते.

या निषेधाच्यावेळी मिलिंद मेस्त्री म्हणाले, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकमेकांची शत्रू असलेली राष्ट्रेही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत . तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या शेजारील राज्याचा माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप तसेच टीका करीत आहेत. आजपर्यंत गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे राहिलेले आहेत.किंबहुना सिंधुदुर्ग हा गोव्याचाच भाग असल्यासारखे वातावरण आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यासाठी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन डॉ. प्रमोद सावंत यांनी शेजारधर्माच्या नात्याने,तातडीची गरज म्हणून काही सिलिंडर पाठवण्याची व्यवस्था केली. या गोष्टीचे गोवा काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना या विषयावरून लक्ष्य करणारे दिगंबर कामत यांचा भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. असेही ते म्हणाले.


 

Web Title: Former Goa Chief Minister Digambar Kamat protested by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.