कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत

By अनंत खं.जाधव | Published: August 24, 2022 07:10 PM2022-08-24T19:10:27+5:302022-08-24T19:24:22+5:30

माजी खासदार सुधीर सावंत हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पण त्यांनी बारा वर्षापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

Former MP Sudhir Sawant supports the Chief Minister Eknath Shinde group | कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत

कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत

Next

सावंतवाडी : माजी खासदार सुधीर सावंत यांनी आज, बुधवारी शिंदे गटाला समर्थन दिले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री दीपक केसरकर व उदय सामंत यांच्या सोबत पक्ष वाढवणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देत माजी सैनिकाबाबत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन घेतले. त्यानंतर केसरकरांनी सावंत यांचे स्वागत केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, गणेशप्रसाद गवस, शैलेश दळवी, सचिन वालावलकर, योगेश तेली, बबलू पांगम, विनायक शेट्वे, ओंकार परयेकर, ज्ञानेश्वर शेटवे उपस्थित होते.

माजी खासदार सुधीर सावंत हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पण त्यांनी बारा वर्षापूर्वी काँग्रेसचा राजीनामा देत बसपामध्ये प्रवेश केला होता. मात्र तेथे त्यांचे विचार न पटल्याने अखेर आप मध्ये प्रवेश केला. तेथून ही ते बाहेर पडले. त्यानंतर महाराष्ट्रात माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात सक्रिय झाले होते. त्यांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक प्रश्न मार्गी लावत सैनिकांचे संघटन ही केले होते. आजही हे संघटन कायम आहे.

हेच प्रश्न घेऊन शासन दरबारी अनेक प्रश्न मांडले पण त्याला न्याय मिळत नव्हता. अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवड्यापूर्वी भेट घेतली या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सैनिक प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत त्यातून मार्ग काढला. तसेच सैनिक निधी वितरित करत अन् प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज त्यांनी शिंदे गटाला सर्मथन देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान सावंत यांनी शिंदे गटाला दिलेल्या समर्थनाबाबत मंत्री उदय सामंत यांनी आभार मानत जिल्हयाला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले.

Web Title: Former MP Sudhir Sawant supports the Chief Minister Eknath Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.