माजी विद्यार्थ्यांचा ‘शिक्षकदिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2015 09:40 PM2015-09-07T21:40:08+5:302015-09-07T21:40:08+5:30
सिंधुदुर्ग महाविद्यालय : विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान देण्याची गरज
मालवण : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने शिक्षकदिन साजरा करण्यात आला. रोजच्या शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनाचे
औचित्य साधून बरेच काही शिकता आले, अशा भावना व्यक्त केल्या.
माजी विद्यार्थ्यांनी नवीन पिढीला मार्गदर्शक, असे विषय निवडून मोलाचे मार्गदर्शन करीत यशाचा मार्ग दाखविला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही एक दिवसीय शिक्षकांना सहकार्य करीत माजी विद्यार्थ्यांचा ‘शिक्षक दिन’ यशस्वी केला.
सिंधुदुर्ग महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. त्याचाच एक भाग
म्हणून शिक्षकदिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी
८ ते ९.३० या वेळेत आठ ‘एक दिवसीय’ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यशाचे धडे दिले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही शिक्षणाचा आनंद दिसून येत
होता.
प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, सुमेधा नाईक, डॉ. आर. एन. काटकर, डॉ. उज्ज्वला सामंत, बी. एच. चौगुले, एच. एम. चौगले, डी. व्ही. हारगिले, भक्ती मेस्त्री, आदी प्राध्यापकांनी माजी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. प्राचार्य मंडले यांनी माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
अभियंता लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी ‘नवीन धंदो कसो करायचो आनि असलेलो धंदो कसो टॉपला न्यायचो...’ या विषयावर मालवणी बोलीभाषेतून मार्गदर्शन केले. महेंद्र पराडकर यांनी ‘सरकार कोणाचे, तुमचे की आमचे’, महादेव पाटकर यांनी ‘प्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर’ यावर अध्ययन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
गौरव ओरोसकर यांनी ‘जबाबदार व्हा, यशस्वी व्हा’ , महेश काळसेकर यांनी ‘भाषण शास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. उद्योजक नितीन वाळके यांनी ‘काय वाचता आणि काय वाचाल’ या विषयावर उदाहरणांच्या सहायाने शिकविताना विद्यार्थ्यांची फिरकीही घेतली.
तर अजय शिंदे यांनी क्रीडाविषयक मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
डिजीटल शिक्षण पद्धतीचा अवलंब
गौरी मयेकर यांनी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या सहायाने २१ व्या युगात डिजीटल शिक्षण पद्धतीचे असणारे फायदे विषद केले. यात ई-बँकिंग, ई- लर्निंग, आॅनलाईन बुकिंग याची माहिती दिली. भविष्यात डिजीटल शिक्षण पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगितले. तर अॅड. सोनल पालव-बंदरकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
आजचा शिक्षकदिन आमच्यासाठी खास होता. नेहमीच्या शिक्षणापेक्षा एक दिवस का होईना नवीन गोष्टी शिकता आल्या. सर्व शिक्षकांनी मनोरंजनात्मक शिकविल्याने नवे विचार ऐकता आले. समाजातील अनेक स्थित्यंतरे शिक्षकांनी विशद करताना पूवीर्ची जीवन पद्धत आणि आजची जीवन पद्धती याची जाणीव करून दिली. यामुळे आजचा शिक्षकदिन आमच्यासाठी खास ठरला.