जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार बी.बी. गायतोंडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:07 AM2021-03-27T10:07:28+5:302021-03-27T10:11:21+5:30
B.B. Gaitonde passed away: बी.बी. गायतोंडे यांचे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ही मोठे असून त्यांना अनेक पुरस्कारांनी ही गौरविण्यात आले आहे.
Next
सावंतवाडी : जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार तसेच बांदा शहरातील आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात अतुलनिय कार्य केलेले बांदा गावचे सुपुत्र डॉ.बी.बी. गायतोंडे यांचे मध्यरात्रीच्या सुमारास बांदा येथील राहत्या घरी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. आज शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेेत. ( B.B. Gaitonde worked for WHO.)
गायतोंडे यांचे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ही मोठे असून त्यांना अनेक पुरस्कारांनी ही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने बांदा परिसरात शोककळा पसरली आहे.