नोकरीच्या आमिषाने चाळीस लाखाला गंडा

By admin | Published: September 4, 2016 12:26 AM2016-09-04T00:26:30+5:302016-09-04T00:27:15+5:30

११ जणांची फसवणूक : रत्नागिरीतील ठकसेनाला अटक

Forty-five laps by job bait | नोकरीच्या आमिषाने चाळीस लाखाला गंडा

नोकरीच्या आमिषाने चाळीस लाखाला गंडा

Next

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावतो, असे सांगून रत्नागिरीतील एका तरुणाने कोल्हापूरमधील अकराजणांना ४० लाख ४० हजार रुपयांना गंडा घातला आहे. हे अकराजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. फसवणूक करणाऱ्या परितोष मधुकर बिर्ला (रा. बोर्डिंग रोड, माळनाका, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे.
नोकरीचे आमीष दाखविताना परितोष बिर्ला याने जिल्हा परिषदेचे खोटे शिक्केही तयार केले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
कापशी (ता. शाहूवाडी, कोल्हापूर) येथील बेबीताई अशोक गोपणे यांची परितोष बिर्ला याच्याशी ओळख झाली होती. अधूनमधून दूरध्वनीवरूनही त्यांचे परितोषशी संभाषण होत असे. १ जून ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत परितोष बिर्ला हा नेहमी त्यांना फोन करीत होता. आपली जिल्हा परिषदेमध्ये चांगली ओळख आहे. तुमच्या मुलीला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीला लावतो, असे परितोषने सांगितले. त्यासाठी जिल्हा परिषदेचे बनावट शिक्के तयार करून त्याने काही खोटी नियुक्ती पत्रे तयार केली होती. त्याच शिक्क्यांच्या आधारे त्याने मुलाखतीची पत्रेही हाती दिली होती.
परितोषशी झालेले आपले संभाषण आणि त्याने दाखविलेले नोकरीचे आमीष याबाबत त्यांनी आपल्या नातेवाइकांशी चर्चा केली. बेबीताई गोपण यांनी मुलाखतीचे पत्र मिळाल्यानंतर दोन लाख ४0 हजार रुपये परितोषला दिले. आपल्या मुलाला नोकरी लागावी, यासाठी बेबीतार्इंच्या नातेवाइकांनीही पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यांनाही परितोषने नोकरीचे आमीष दाखविले.
आपल्या मुलाच्या नोकरीसाठी म्हणून कोल्हापूरमधीलच किरसिद्ध बडगर यांनी चार लाख रुपये, सुजाता गोपणे यांनी तीन लाख ४० हजार रुपये, गणेश गोपणे यांनी दोन लाख रुपये, घनश्याम जमादार यांनी दोन लाख ५० हजार रुपये, शुखला मोहिते यांनी तीन लाख ५० हजार रुपये, उमाकुमार माने यांनी चार लाख रुपये, प्रकाश पाटील यांनी तीन लाख रुपये, चव्हाण यांनी एक लाख रुपये, भूषण गडकरी यांनी तीन लाख रुपये, अभिषेक जरात यांनी सहा लाख रुपये असे ११ जणांनी ४० लाख ४० हजार रुपये परितोषला दिले होते. पत्रे मिळूनही मात्र अजूनही नोकरीचा कसलाच पत्ता नसल्याने बेबीताई गोपण यांनी परितोष याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी परितोषला अटक केली आहे. (वार्ताहर)


फसवणुकीचे वाढते प्रमाण
शहरात फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. विजया लक्ष्मी बचत ठेव प्रकरण उघड होऊन काही दिवस उलटले असतानाच, पुन्हा एकदा फसवणुकीचा गुन्हा उघड झाला आहे.

Web Title: Forty-five laps by job bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.