संघटित शक्तीतून उदरनिर्वाहाचा पाया

By admin | Published: September 3, 2016 08:52 PM2016-09-03T20:52:50+5:302016-09-04T00:30:37+5:30

सेंट बेनेडीक महिला बचतगटाची किमया : मच्छी व्यवसाय, कॅटरिंंगसह शिवणकामात नावलौकिक

The foundation of living from united power | संघटित शक्तीतून उदरनिर्वाहाचा पाया

संघटित शक्तीतून उदरनिर्वाहाचा पाया

Next

सावंतवाडी : एकमेकींच्या दैनंदिन सहवासातून जोडल्या गेलेल्या महिलांनी संघटित होत बचतगटाची स्थापना केली आहे. या संघटित ताकदीच्या जोरावर दैनंदिन गरजा भागवित या रणरागिणींनी मच्छी व्यवसाय, कॅटरिंग, शिवणकाम, आदी उद्योगांच्या यशस्वीतेतून उदरनिर्वाहाचा भक्कम पाया उभारला आहे. सेंट बेनेडिक महिला बचतगटाची ही यशोगाथा सावंतवाडी तालुक्यात नावलौकिक करून आहे.
सावंतवाडी-खासकिलवाडा येथील सेंट बेनेडीक महिला बचतगटाची स्थापना २२ जुलै २००९ला सर्व महिलांनी एकत्रित येऊन केली. सुरुवातीला या बचतगटाने
५० रुपये प्रतिमहा वर्गणी काढून गटाला सुरुवात केली. बचतगटाच्या यशस्वी वाटचालीने ही वर्गणी आता १०० रुपये प्रतिमहापर्यंत पोहोचली आहे. एकमेकांच्या सहकार्याने या महिलांनी आपल्या गरजा भागवित यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रारंभी या बचतगटाने मत्स्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सावंतवाडी शहरातील मच्छी बाजारपेठेत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. महिलांच्या संघटित शक्तीचा नगर परिषदेतील हा बहुधा पहिलाच प्रकार तसा परिषदेच्या प्रशासनातही कौतुकास्पद ठरला. त्याचबरोबर गटातील काही महिलांनी कॅटरिंग, शिवणकामसारखे व्यवसाय सुरू केले. यातून या महिलांना रोजगार निर्मितीही झालीच; त्याचबरोबर उदरनिर्वाहाचा प्रश्नही निकालात निघाला. यातून येणारा फायदा दरवर्षी बचतगटातील महिलांना वाटप केला जातो. यामध्येही आजपर्यंत विश्वासार्हता जपली गेली आहे.
पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमातही या बचतगटाने विविध स्टॉल लावून रोजगाराचे साधन उपलब्ध केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी वेळोवेळी धडपडणाऱ्या या बचतगटातील महिलांनी एकत्रित येत गेल्या सात वर्षांपासून महिला संघटन करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेंतर्गत दोन लाख रुपये बचतगटाला देण्यात आले होते. त्याची परतफेड सर्व महिला एकत्रितपणे व्यवसायातून करीत आहेत. प्रशासनाने या बचतगटाला सुविधांद्वारे सहकार्य केले
आहे. त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचे काम या बचतगटाने केले आहे.
सावंतवाडी-खासकिलवाडा येथील सेंट बेनेडीक महिला बचतगटात अध्यक्ष एलिजा जॉनी डिसोजा, उपाध्यक्ष दर्शना डिसोजा यांच्यासह सदस्य मॉलिनी डिसोजा, लेपोलदीन डिसोजा, लुईजा डिसोजा, त्रिजा डिसोजा, इनासीन डिसोजा, इजाबेल डिसोजा, आशा फर्नांडिस, संध्या घोन्साल्विस, लुड्डीन डिसोजा आदींचा समावेश आहे.


यशाच्या पायरीसाठी प्रयत्नांची गरज
व्यवसायात दरवेळी नफाच होतोच असे नाही. काही वेळा तोटाही सहन करावा लागतो. यावेळी खचून न जाता जोमाने आपला व्यवसाय सुरू ठेवून मागील तोट्याची दरी भरून काढण्यास प्रयत्न करावे लागतात. यशाची पायरी नक्कीच आपल्याला मिळते. तिथपर्यंत प्रयत्न गरजेचे आहेत आणि महिलांमध्ये ती शक्ती अमर्याद असते.
- एलिजा डिसोजा, अध्यक्ष



मच्छी व्यवसायात ‘कभी खुशी
कभी गम’
बाजारपेठेमध्ये मच्छी
घेण्यासाठी दररोज ग्राहकांची गर्दी असतेच असे नाही. काहीवेळा तर ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने नुकसान सहन करून व्यवसाय
करावा लागतो.
काहीवेळा खरेदी केलेल्या
मालापेक्षा कमी दरात वस्तंूची
विक्री करावी लागते.
अशावेळी तोट्यालाही सामोरे जाऊन व्यवसाय करावा लागतो.

Web Title: The foundation of living from united power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.