दहा दिवसांत चार लाख पर्यटकांची भेट

By admin | Published: May 11, 2015 09:59 PM2015-05-11T21:59:08+5:302015-05-11T23:27:42+5:30

महाबळेश्वर बहरले : वातावरणातील बदलाने जगभरातील पर्यटक सुखावले

Four lakh tourists visit in 10 days | दहा दिवसांत चार लाख पर्यटकांची भेट

दहा दिवसांत चार लाख पर्यटकांची भेट

Next

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झालाय. ऐन उन्हाळ्यात येथे झालेल्या वळवाच्या पावसाने ‘पर्यटक राजा’ चांगलाच सुखावला आहे. उन्हाळी हंगामात वातावरणात झालेल्या या बदलामुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले आहे. गेल्या दहा दिवसांत सुमारे चार लाख पर्यटकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे.महाबळेश्वर हे पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात; परंतु पर्यटकांचा मुख्य हंगाम हा एप्रिल आणि मे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, महाबळेश्वर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. कडक उन्हाळ्यात महाबळेश्वरात पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. एप्रिल महिन्यात कितीतरी वेळा असे वातावरण पाहावयास मिळाले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या पावसामुळे वातावरणात बदल घडला आहे. काही हौशी पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांनीही या पावसाचा आनंद लुटला.
पर्यटकांचा उन्हाळी हंगाम सुरू झाल्याने येथील हॉटेल व्यावसायिक तसेच मुख्य बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली
आहे. महाबळेश्वरची खासियत असणाऱ्या स्ट्रॉबेरीपासून ते जाम, जेली, चिक्की, चने अशा एकापेक्षा एक वस्तूंनी बाजारपेठ बहरून गेली आहे. पर्यटक दिवसभर येथील विविध पॉइंटला भेट देत आहेत. तर सायंकाळी नौकाविहारासाठी पर्यटकांची वेण्णा तलाव येथे गर्दी होत
आहे. महाबळेश्वरसह पाचगणीलाही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत
आहेत. (प्रतिनिधी)

गुजराती पर्यटकांची संख्या अधिक
एप्रिल आणि मे हे महाबळेश्वरवासीयांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे महिने. यावेळी येथे पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये गुजराती पर्यटकांची संख्या अधिक आहे. या व्यतिरिक्त, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब या राज्यांतूनही पर्यटक दाखल होत आहे.

Web Title: Four lakh tourists visit in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.