जिल्ह्यात डेंग्यूचे चार रुग्ण
By admin | Published: September 1, 2015 09:41 PM2015-09-01T21:41:22+5:302015-09-01T21:41:22+5:30
आरोग्य यंत्रणा सतर्क
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यूचे आणखी चार रुग्ण आढळून आले आहेत. या चारही जणांना अधिक उपचारासाठी ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
संतोष बाबू खरात (वय २१, रा. असलदे, धनगरवाडी), सचिन प्रभाकर देसाई (३०, रा. पिसेकामते, वरचीवाडी), रामकृष्ण मनोहर मोंडकर (३५, रा. चाफेड, देवगड) आणि अनिकेत अशोक साळुंखे (११, रा. आंबेआळी, कणकवली) अशी त्यांची नावे आहेत. ताप येत असल्याने या रुग्णांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी केलेल्या तपासणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दहा दिवसांत कुडाळ तालुक्यातील तीन लहान बालकांचा तापसरीत मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. (प्रतिनिधी)