कणकवलीत महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण सुरु, सात वयोवृध्द नागरिकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 01:21 PM2018-01-10T13:21:52+5:302018-01-10T13:22:00+5:30

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांवर अन्याय होत असून शासन तसेच प्रशासनाचे याकडे विविध माध्यमातून लक्ष वेधूनही त्याची योग्य दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांच्यावतीने  वयोवृध्द नागरिकानी  बुधवारी सकाळी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली.

Four people including four from Kankavali highway | कणकवलीत महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण सुरु, सात वयोवृध्द नागरिकांचा समावेश

कणकवलीत महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण सुरु, सात वयोवृध्द नागरिकांचा समावेश

Next

कणकवली (सिंधुदुर्ग) : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांवर अन्याय होत असून शासन तसेच प्रशासनाचे याकडे विविध माध्यमातून लक्ष वेधूनही त्याची योग्य दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी कणकवलीतील  प्रकल्पग्रस्तांच्यावतीने  वयोवृध्द नागरिकानी  बुधवारी सकाळी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली.

कणकवली बाजारपेठेतून महामार्ग क्रमांक 66 जात आहे. या महामार्गासाठी भुसंपादन करताना  शासन प्रकल्प ग्रस्तांची दिशाभूल आणि फसवणूक करून  त्याना नेस्तनाभूत  करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशासनाने चुकीच्या निकषांवर   मिळकतींचे मूल्यांकन करून प्रकल्पग्रस्तांना पूर्णतः उ्ध्वस्त करून या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा डाव आखला आहे.हे  लक्षात आले तेव्हा खासदार विनायक राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी याप्रकरणी लक्ष घालून प्रकल्पग्रस्तांना  न्याय मिळावा यासाठी वारंवार प्रयत्न केले.
मात्र, शासनाने आता पर्यन्त प्रकल्पग्रस्तांच्या  मागण्याना केराची टोपली दाखविली आहे. प्रशासनाने मागण्यांची  दखल घ्यावी म्हणून 7 डिसेंबर 2017 रोजी कणकवली शहर पूर्णतः बंद ठेवून प्रकल्पग्रस्तांच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पण शासनास  त्याची दखल घ्यावीशी वाटलेली नाही. त्यामुळे 10 जानेवारी 2018 पासून मागण्या मान्य होईपर्यन्त  प्रकल्पग्रस्तानी  आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली असल्याचे प्रकल्पग्रस्तानी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रांताधिकारी कार्यालय परिसरात  कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
     
वयोवृद्ध प्रकल्पग्रस्तांचे उपोषण !

कणकवली शहरातील मधुकर ठाणेकर( वय 89 वर्षे), आनंद अंधारी(वय 85 वर्षे), सत्यवान मांजरेकर( वय 80 वर्षे), सुभाष काकडे( वय 73 वर्षे), दत्तात्रय सापळे(वय 72 वर्षे), शामसुंदर बांदेकर(वय 80 वर्षे), गंगाधर ठाणेकर(वय 87 वर्षे) हे वयोवृध्द नागरिक प्रकल्पग्रस्तांच्यावतीने अन्याया विरोधात बुधवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले. यावेळी अन्य प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामार्ग चौपदरिकरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या !

प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा मिळकतीचा मोबदला कवडिमोल असून बांधकाम प्रति चौ.फू. रूपये 15000 व जमिनीचा दर प्रती गुंठा  15 लाख रूपये मिळावा. कणकवली शहर हे ग्रामीण भागाप्रमाणेच असल्यामुळे गुणांक 2 करावा. भाडेकरु व्यापाऱ्याना नुकसान भरपाई मिळावी. स्टॉल धारक व भाजी व्यापाऱ्याना जागेचा पर्याय उपलब्ध करावा. बांधकाम मूल्यांकनाचे कागदपत्र त्वरीत मिळावेत. कणकवली शहराची फेरमोजणी व फेर मूल्यांकन व्हावे. सार्वजनिक बांधकाम विभागातील चुकीच्या पध्दतीने मूल्यांकन  केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच हे शक्य नसेल तर आम्हाला आमच्या कुटुंबियांसह गोळ्या घालून ठार मारून आमची शासकीय जाचातून सुटका करावी,अशा विविध मागण्या प्रशासन व शासन यांच्याकडे लेखी स्वरूपात प्रकल्प ग्रस्तांनी केल्या आहेत.

Web Title: Four people including four from Kankavali highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.