काडतुसाच्या बंदुकीसह चारजण जेरबंद, सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
By अनंत खं.जाधव | Published: April 24, 2023 06:54 PM2023-04-24T18:54:16+5:302023-04-24T18:54:32+5:30
सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील कडावल बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कारवाई करत दोन अवैद्य काडतुसांच्या बंदुकीसह चारजणांना जेरबंद केले. ...
सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील कडावल बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कारवाई करत दोन अवैद्य काडतुसांच्या बंदुकीसह चारजणांना जेरबंद केले. तसेच त्याच्याकडून १३ जिवंत काडतुसे, एक कार, दुचाकी व इतर साहित्य असा 6 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल, रविवारी पहाटेच्या सुमारास केली.
सिंधुदुर्ग जिल्हयात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक याच्याकडून देण्यात आलेल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गृप्त माहितीच्या आधारे पंग्रड जंगलात कुडाळ येथील काही इसम कार व मोटार सायकलने जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी अलर्ट होत पाठलाग केला याच वेळी कडावल बाजारपेठेत सापळा रचून अजित लाडोबा तांबे (५५ वर्षे, रा. वक्रतुंड कॉम्पेक्स, कुडाळ), दत्ताराम संभाजी परब (५० वर्षे, रा. वक्रतुंड संकुल, लक्षीवाडी, कुडाळ ), सिध्देश सुरेश गावडे ( २४ वर्षे, रा. अणसुर, टेंबवाडी, वेंगुर्ला ), नारायण प्रकाश राउळ, (१९ वर्षे, रा. तेंडोली, खरातवाडी, कुडाळ) या चौघांना ही ताब्यात घेण्यात आले.
हे चौघे पांग्रडवरुन कुडाळकडे एक कार ने व दुचाकी ने जात असतना वाहाने थांबवून तपासणी केली असता त्याच्याकडे दोन काडतूस बंदूका व १३ जीवंत काडतूसे आढळून आली ती हस्तगत करण्यात आली असून कार दुचाकीसह ६,१४, हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई करण्याबाबत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक संदिप भोसले सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी ही कारवाई केली. संशयित आरोपींविरुध्द कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.