भरधाव कारने समोरील वाहनांना ठोकरले, चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 10:59 AM2021-12-18T10:59:32+5:302021-12-18T11:03:46+5:30

भरधाव वेगाने पुण्याकडून गोव्याकडे निघालेल्या कारने समोरील वाहनांना ठोकरले. या तिहेरी अपघातात चार जण जखमी झाले.

Four persons were injured in a car accident in Sindhudurg | भरधाव कारने समोरील वाहनांना ठोकरले, चार जण जखमी

भरधाव कारने समोरील वाहनांना ठोकरले, चार जण जखमी

googlenewsNext

सिंधुदुर्ग : भरधाव वेगाने पुण्याकडून गोव्याकडे निघालेल्या कारने (एम.एच-१४-ईवाय-९८३४) समोरील वाहनांना ठोकरले. या तिहेरी अपघातात चार जण जखमी झाले. महामार्गावर जानवली हनुमान मंदिरासमोर हा अपघात घडला. कारने मागून ठोकरल्याने रिक्षाला पलटी झाली.

अपघातातील सर्व जखमींना सामाजिक कार्यकर्ते दामू सावंत व जानवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

याबाबत माहिती अशी की, अपघातातील कार पुण्याकडून गोव्याकडे निघाली होती. ही कार महिला चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कार चालक महिलेचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. जानवली येथे याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने आवश्यक सूचना फलक लावण्याचे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.

Web Title: Four persons were injured in a car accident in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.