भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी
By admin | Published: May 8, 2017 03:53 PM2017-05-08T15:53:09+5:302017-05-08T15:53:09+5:30
सिंधुदुर्ग येथे २४ मे रोजी मुलाखती
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. 0८ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक १ जून २0१७ ते १0 जून २0१७ या कालवधीत एसएसबी कोर्स क्र. ४२ चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक २४ मे २0१७ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी पीसीटीसी ट्रेनिंगच्या गुगल प्लस पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट महासैनिक डॉट कॉमवरील रिक्रुटमेंट टॅबला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध चेक लिस्ट आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पुर्ण भरुन आणावे.
केंद्रामध्ये एस. एस. बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी कंम्बाईड डिफेंस सर्व्हिसेस एकझामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एकझामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी उ सर्टिफिकेट अ किंवा इ ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव, आदी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.