‘एफआरआय’चा वापर महिलांनी करावा !

By admin | Published: May 11, 2016 11:47 PM2016-05-11T23:47:45+5:302016-05-11T23:52:46+5:30

शंकर पाटील : सिंधुदुर्ग पोलिस दलाचे नावीन्यपूर्ण अ‍ॅप

'FRI' should be used by women! | ‘एफआरआय’चा वापर महिलांनी करावा !

‘एफआरआय’चा वापर महिलांनी करावा !

Next

मालवण : जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे याच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पोलिस दलातर्फे जिल्ह्यात ‘एफआरआय’ हे नावीन्यपूर्ण असे अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. मुली तसेच महिलांनी तातडीच्या अत्यावश्यक मदतीसाठी याचा वापर करावा, असे आवाहन मालवणचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.अ‍ॅपबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रत्येक दोन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तसेच नियंत्रण कक्ष येथे सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या वेबसाईटवर ‘एफआयआर’ला प्रतिसाद मिळत आहे. अ‍ॅप कार्यान्वित करण्यासाठी अप्पर पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आनंदराव काळे व सहकारी यांनी विशेष प्रयत्न
केले. महिला व मुलींनी वरील उपयुक्त अ‍ॅप डाऊनलोड करून नोंदणी करून ठेवावी. या अ‍ॅपच्या सुधारणेसाठी नागरिकांच्या सूचना अथवा तक्रारी असल्यास पोलिस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. तसेच या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

असे असेल अ‍ॅप
स्मार्टफोनवरील प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘एफआयआर’ या नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊन लोड करावे. त्याचा आयकोन दिसेल. संकटात सापडल्यास व्यक्तीने मदतीसाठी स्मार्टफोनमध्ये इन्सस्टॉल असणारे हे अ‍ॅप ओपन करून ‘हेल्प’ असे लिहिलेले लाल बटन दाबताच अ‍ॅपच्या माध्यमातून मदतीचा संदेश पोलिस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथे मिळेल. संदेश प्राप्त होताच मोबाईलवरील हेल्प बटणाचा रंग निळा होतो. नियंत्रण कक्षात संदेश प्राप्त झाल्यानंतर संकटात सापडलेल्या व्यक्तीपासून नजीकच्या अंतरावर तातडीने उपलब्ध होणारे पोलिस अधिकारी-कर्मचारी यांना सूचित केले जाते. आणि लागलीच पोलिस मदत मिळते.

Web Title: 'FRI' should be used by women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.