दुष्काळग्रस्तांना सव्वा लाखाचा निधी
By admin | Published: December 15, 2015 11:14 PM2015-12-15T23:14:59+5:302015-12-15T23:22:52+5:30
फोंडाघाट येथील ब्राह्मणेश्वर उन्नती मंडळाचा उपक्रम : मराठेंनी दिला प्रांताधिकाऱ्यांकडे धनादेश
फोंडाघाट : ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट आणि शिक्षण संकुलातील ज्युनिअर कॉलेज कृषी पदविका विद्यालय व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळ निधीसाठी १ लाख १५ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. संस्थाध्यक्ष नामदेवराव मराठे यांच्या हस्ते विश्वस्त विद्या राणे पाटील यांच्या उपस्थितीत कणकवली प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्याकडे धनादेश सोमवारी सुपूर्द करण्यात आला.यावेळी तहसीलदार समीर घारे, नायब तहसीलदार आर. जे. पवार तसेच सरपंच आशा सावंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन परेश जोशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृषि तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रसाद खांबल यानी मानले. (वार्ताहर)
या प्रकारचा या वर्षातील पहिलाच उपक्रम असून या संस्थेने केलेले कार्य हे इतर सर्व संस्थासमोर एक आव्हान व कौतुकास्पद असा आहे. कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जे उपक्रम राबवत जे गावोगाव उपक्रम राबविले जातात. जे प्रात्यक्षिक करून लोकांमध्ये जनजागृती केली जाते ते आदर्शदायी आहे. असाच उपक्रम अन्य संस्था, मंडळांनी राबविण्याचा प्रयत्न करावा.
-संतोष भिसे