अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे निधी खर्चीला नाही

By admin | Published: June 12, 2015 12:24 AM2015-06-12T00:24:01+5:302015-06-12T00:31:16+5:30

रामदास कोकरे यांची खंत : ई-टेंडरींगची माहिती लपविण्याचा वेंगुर्लेतील नगरसेवकांचा आरोप

The funds have not been spent due to the ignorance of the officers | अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे निधी खर्चीला नाही

अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे निधी खर्चीला नाही

Next

वेंगुर्ले : येथील शिवाजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या मासिक सभेत गुरुवारी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत ई-टेडरिंगची माहिती लपविण्याचा त्यांच्यावर आरोप लावला. यावर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अधिकाऱ्यांनी आदेशाच्या चुकीचा अर्थ घेतल्यामुळे विकासनिधी खर्ची झाला नसल्याची खंत व्यक्त केली.
नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी कोकरे म्हणाले की, शासनाकडून येणाऱ्या परिपत्रकांचा चुकीचा अर्थ मागील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काढल्याने शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे, त्यामुळे विकासनिधी अखर्चित राहिला आहे, अशी माहिती कोकरे यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष कुबल यांनी नाथ पै रोडवरील गणेश कॉम्प्लेक्सच्या समोरील गटारात साचलेल्या सांडपाण्याचा नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत कारवाई करण्याचे सूचविण्यात आले. शहरातील ओहळांची साफसफाई करण्यात आली असून गटारांची साफसफाई करण्याचे काम सुरू असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. नगरपरिषद उपविधी दुरूस्तीबाबत लवकरच कौन्सिलकडे मंजुरीकरिता प्रस्ताव आणण्यात येणार आहे, परंतु आपल्या नगरपालिकेचे भाजी मार्केट हे दैनंदिन असताना व्यावसायिकांनी आपली दुकाने नियमात न थाटल्याने ग्राहकांना बाजारात ये-जा करताना अडथळा निर्माण होत असल्याबाबत उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी जोरदार आक्षेप घेत पूर्वीप्रमाणेच जागा निश्चित करून दैनंदिन मार्केट सुरू करावे, अशी आग्रही मागणी केली. यावर मुख्याधिकारी कोकरे यांनी तातडीने कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले. घरपत्रक उतारा, जन्मनोंद आता नागरिकांना त्वरित उपलब्ध होत आहे. वारस नोंद तातडीने नोंद होण्याबाबत मुख्याधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालणार असल्याचे अ‍ॅड. सुषमा खानोलकर व अ‍ॅड. जी. जी. टांककर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक मनीष परब, महेश वेंगुर्लेकर, प्रशांत नेरूरकर, सुलोचना तांडेल, निला भागवत, चेतना केळुसकर, फिलोमिना कार्डोज, कार्यालयीन अधीक्षक हनिफ म्हाळुंगकर, लिपिक आनंद कदम, सागर चौधरी, संगिता कुबल, राजेश परब, कमलेश सातार्डेकर आदी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या नवीन रेन हॉर्वेस्टींग व स्वच्छता अभियानांतर्गत येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या बंदी व घर तेथे शौचालय सुविधा या योजनेला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले
आहे. (प्रतिनिधी)


नगपरिषद ड्रॉमेट्री हॉल भाड्याने देणार
रामेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेला नगरपरिषदेचा ड्रॉमेट्री हॉल भाड्याने देण्याचे ठरविण्यात आले असून एका दिवासासाठी ५०० रूपये भाडे आकारण्याचे या सभेत सर्वानुमते निश्चित करण्यात आले आहे.

Web Title: The funds have not been spent due to the ignorance of the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.