निधी केसरकरांचा, मग श्रेय तुमचे कसे? : शिवसेनेचा सवाल ; प्रभारी नगराध्यक्षांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:37 AM2019-11-29T11:37:09+5:302019-11-29T11:39:19+5:30

या विकासाच्या कामाचे श्रेय दीपक केसरकर यांना जाते. शहराचे आधुनिक शिल्पकार म्हणून दीपक केसरकर यांना ओळखले जाते. नगराध्यक्ष, आमदार, पालकमंत्री, राज्यमंत्री अशा सर्व वाटचालीत केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे.

 Funds of saffron, how are you credited? : Shiv Sena issue | निधी केसरकरांचा, मग श्रेय तुमचे कसे? : शिवसेनेचा सवाल ; प्रभारी नगराध्यक्षांवर टीका

निधी केसरकरांचा, मग श्रेय तुमचे कसे? : शिवसेनेचा सवाल ; प्रभारी नगराध्यक्षांवर टीका

googlenewsNext
ठळक मुद्देअन्य कुणीही पत्रकार परिषद घेऊन विकासकामे मंजूर केल्याच्या थापा मारू नयेत, असा इशारा वारंग यांनी दिला.

सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव आर्थिक निधी आणण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी अथक प्रयत्न केले आहेत. शहराच्या विकासाचे आधुनिक शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर दुसऱ्या कोणी श्रेय घेऊ नये, अशी जोरदार टीका नगरपरिषद, आरोग्य व क्रीडा सभापती खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी केली आहे.

सावंतवाडीच्या प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरातील विकासकामांसाठी चार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्र्रे उपस्थित होते.

कुडतरकर म्हणाले, शहरात ४ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली. हा विकास निधी माजी अर्थराज्यमंत्री व पालकमंत्री या नात्याने दीपक केसरकर यांनी दिला आहे. तो अन्य कोणीही आणलेला नाही. या विकासाच्या कामाचे श्रेय दीपक केसरकर यांना जाते. शहराचे आधुनिक शिल्पकार म्हणून दीपक केसरकर यांना ओळखले जाते. नगराध्यक्ष, आमदार, पालकमंत्री, राज्यमंत्री अशा सर्व वाटचालीत केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे.

त्यामुळे जनतेने त्यांना नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सतत पाठिंबा दिलेला आहे, असे कुडतरकर म्हणाले. यावेळी शहराच्या विकासासाठी पालकमंत्री व राज्यमंत्री या नात्याने केसरकर यांनी केलेल्या कामांचा आढावा वारंग यांनी घेतला.

श्रेय केसरकरांचेच!
वारंग म्हणाले, सावंतवाडी शहराचा कायापालट करणारे प्रकल्प आमदार केसरकर यांनी आणले. शहरात विविध रोजगाराच्या प्रकल्पांना प्राधान्य देताना लहान मुलांना खेळण्यासाठी बालोद्यानदेखील निर्माण केले. रघुनाथ मार्केट, जिमखाना क्रीडांगण अशा अनेक प्रकल्पांना केसरकर यांनीच पुढाकार घेऊन निधी आणला आणि शहराचा विकास केला. त्यामुळे विकासाचे श्रेय त्यांचेच आहे. अन्य कुणीही पत्रकार परिषद घेऊन विकासकामे मंजूर केल्याच्या थापा मारू नयेत, असा इशारा वारंग यांनी दिला.

Web Title:  Funds of saffron, how are you credited? : Shiv Sena issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.