मौदे येथील ह्यत्याह्ण युवकावर अखेर अंत्यसंस्कार; पोलिसांनी समजविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 05:47 PM2020-02-01T17:47:38+5:302020-02-01T17:49:15+5:30
उपचार सुरु असताना बुधवारी दत्तारामचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युचे वृत्त कळताच गावातील लोक संतप्त झाले. बुधवारी रात्री उशिरा दत्तारामचा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली जात नाही; तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली होती.
वैभववाडी : बेदम मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या मौदे येथील दत्ताराम परशुराम मोरे याच्यावर गुरुवारी (ता. ३०) रात्री पोलिसांच्या समजुतीनंतर अखेर २२ तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्तारामचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी अत्यंसंस्कार करण्यास नकार दिला होता. दरम्यान, अंत्यसंस्कार केले असले तरी मारहाणकर्त्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीवर कुटुंबीय व ग्रामस्थ ठाम आहेत.
मौदे येथील दत्ताराम मोरे या युवकाला हेत शिवरीफाटा येथे दोघांनी मारहाण करुन उपळे खिंडीत फेकले होते. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दत्तारामला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर त्याने घर गाठले. घरी गेल्यानंतर त्याला वेदना असह्य होऊ लागल्यामुळे स्थानिक डॉक्टरला बोलावून त्याच्यावर उपचार केले. मात्र, वेदना थांबत नसल्याने वैभववाडीत खासगी उपचार करुन त्याला कोल्हापूरला ह्यसीपीआरह्णमध्ये दाखल केले होते. उपचार सुरु असताना बुधवारी दत्तारामचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युचे वृत्त कळताच गावातील लोक संतप्त झाले. बुधवारी रात्री उशिरा दत्तारामचा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली जात नाही; तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली होती.
पोलिसांनी ग्रामस्थांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आपल्या भुमिकेवर ठाम होते. मात्र घरात ठेवलेल्या मृतदेहाची अवस्था पाहून रात्री उशिरा पोलिसांनी पुन्हा नातेवाईक आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच तत्काळ कारवाई करण्यात येईल. परंतु अंत्यसंस्कार वेळेत होणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी समजावले. त्यानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला. त्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिसांचे पथक कोल्हापूरला गेले असून दत्तारामचा शवविच्छेदन अहवाल तातडीने मिळण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
संशयित मोकाट
हेतमधील दोघांनी मारहाण केल्याचे दत्तारामने दुसºया दिवशी घरी गेल्यावर आईला सांगितले होते. त्यानुसार आईने त्या दोन्ही मारहाण करणाºया संशयितांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. तसेच ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीतही ह्यत्यांचीह्ण नावे आहेत. परंतु दोघे संशयित अजुनही मोकाटच आहेत. त्यामुळे मौदेत काहीतरी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.