सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठकीत निर्णय, पक्षनिरीक्षकाची माहिती
By अनंत खं.जाधव | Published: October 16, 2022 07:31 PM2022-10-16T19:31:53+5:302022-10-16T19:32:22+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून असा बैठकीत निर्णय झाला आहे.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही यापुढे गटतट राहणार नाहीत.आजच्या बैठकीत जे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष अनुपस्थित आहेत. त्याच्याकडून निश्चित असा खुलासा मागवण्यात येईल यापुढच्या सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्यात येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस चे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरिक्षक शेखर माने यांनी सांगितले.
सावंतवाडीत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माने बोलत होते.यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले,जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अर्चना घारे-परब,काका कुडाळकर,बाळ कनायळकर,रेवती राणे, प्रफुल्ल सुद्रिक,दर्शना बाबर देसाई,पुंडलिक दळवी भास्कर परब आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरीषदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले पाहिजे. पक्षाची पदे मिळविण्यासाठी नाहीत तर ती पदे संघटना मजबूत करण्यासाठी वापरली पाहिजेत. जे पदाधिकारी कार्यरत नाहीत त्यांच्या पदाचा फेरविचार केला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी सांगितले.
सावंतवाडी विधानसभा निवडणूकीत सावंतवाडीत मतदार संघातून अर्चना घारे परब रिंगणात उतरणार आहेत. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी पक्षाध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आहे. कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब म्हणून काम करीत आहेत.
पुढच्या निवडणूकीतही त्या नक्कीच दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत प्रत्येक पदाधिकार्यांने निवडणुकीला सामोरे गेले पाहीजे. पक्षासाठी काम केले पाहीजे. यासाठी आमचे प्रयत्न आहेत. तशा सुचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. कोणी टाळाटाळ केल्यास त्याला पदावरुन दूर केले जाणार आहे.तसेच जे पदाधिकारी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष बैठकीला अनुपस्थित आहेत.त्याच्याकडून जिल्हाध्यक्ष खुलासा मागवतील असे ही माने यांनी सांगितले.