कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा, २० जण ताब्यात; सव्वा लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 02:27 PM2022-04-20T14:27:37+5:302022-04-20T14:39:19+5:30

कणकवली : कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या जुगार अड्ड्यावरील धाडीत १ लाख २४ ...

Gambling den raided in Kankavali, 20 arrested, Rs 15 lakh cash seized | कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा, २० जण ताब्यात; सव्वा लाखांची रोकड जप्त

कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा, २० जण ताब्यात; सव्वा लाखांची रोकड जप्त

googlenewsNext

कणकवली : कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या जुगार अड्ड्यावरील धाडीत १ लाख २४ हजार रोख रुपये तर १२ दुचाकी, एक तीन आसनी रिक्षा, दोन कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.तर काही गाड्यांचे मालक सापडले नसल्याने अजून संशयित आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास कणकवली नागवे - करंजे हद्दीजवळील नदीच्या किनारी हा जुगार चालू होता. यामध्ये जयवंत आत्माराम बाईत ( ४७, रा . कणकवली, तेलीआळी) , रविंद्र तुकाराम बाणे (५२,रा . आशिये,बाणेवाडी ता . कणकवली),  सिध्देश अरविंद बांदेकर , (३८, रा .कणकवली, परबवाडी) , महादेव सूर्यकांत कुपेरकर (३३ , रा. आवळेगाव, कुंभारवाडी , ता . कुडाळ ), संदीप लक्ष्मण पाताडे ( ४६, रा. कणकवली,तेलीआळी) , राजु शिवराम जमादार (४०, रा .कणकवली,टेंबवाडी ),

चेतन सिताराम जामसंडेकर (२७, रा . सर्जेकोट , ता . मालवण ), प्रविण विठ्ठल आरोलकर (५४, रा . वागदे, सावरवाडी) , विलीन मंगेश बांदेकर ( ३०, रा.देवबाग मोबार , ता . मालवण ), यशवंत विष्णु देसाई (३७, रा . कणकवली, म्हाडगुत कॉम्प्लेक्स ) , निलेश मनोहर हेरेकर( ४२, रा .कणकवली शिवाजीनगर) ,संदीप रामचंद्र राणे( ४६,रा.कणकवली परबवाडी ),  जयन राजेंद्र सुतार ( २९, रा . कणकवली, कांबळेगल्ली) , प्रदीप राजेंद्र शिर्सेकर (३८, रा . मालवण धुरीवाडा ) ,

संकेत अरविंद बांदेकर ( ३२ ,रा . कणकवली,परबवाडी), मोसीन नुरमहम्मद मुजावर (३४,रा.मालवण, मेढा ), राजेंद्र शशिकांत सावंत( ५० , रा . आवळेगाव ,देऊळवाडी ),  नदीम नुरमहम्मद मुजावर (३६ , रा . मालवण मेढा ), संतोष बाळकृष्ण चव्हाण( ४७, रा .कडावल,सुर्वेवाडी ), रमेश रामचंद्र येरागी( ४६, रा . देवबाग, मोबार )यांचा समावेश आहे.

ही कारवाई कणकवली पोलिसांनी

गनिमी काव्याचा वापर करीत केली.   पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी योग्य नियोजन करून ही धाड टाकली. या पथकात हवालदार दाजी सावंत,चंद्रकांत झोरे, पांडुरंग पांढरे , रुपेश गुरव, मनोज गुरव, किरण मेथे, कैलास इंफाळ, किरण कदम, चंद्रकांत माने आदी सहभागी झाले होते. ताब्यात घेतलेल्या सर्व मुद्देमालासह सर्व संशयित आरोपीना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

Web Title: Gambling den raided in Kankavali, 20 arrested, Rs 15 lakh cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.