विश्वरूप दर्शनाने गणपतीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 05:47 PM2017-10-09T17:47:18+5:302017-10-09T17:49:13+5:30
मालवण : मालवण भरड येथील श्री दत्तमंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. भव्य मिरवणूक तसेच मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेला विश्वरूप दर्शन हा चलत्चित्र देखावा साºयांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. मालवण बंदरजेटी येथे गणेशमूर्तीचे शनिवारी विसर्जन करण्यात आले.
मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणेश चतुर्थीपासून विविध धार्मिक कार्यकम पार पडले. यात भजन, कीर्तन महोत्सव, डबलबारी, दशावतारी नाटक, सत्यनारायणाची महापूजा आदी कार्यक्रमांची रेलचेल होती.
दत्त मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाची विधिवत पूजाअर्चा करून सायंकाळी महाआरती करण्यात आली. तसेच पालखी सजवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक सहभागी झाले होते. बंदरजेटी येथे विसर्जनावेळी भावपूर्ण वातावरण होते.
गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षण ठरलेल्या ह्यविश्वरूप दर्शनह्ण देखाव्यात कृष्ण - धैर्य वस्त, अर्जुन - गौरव कोचरेकर, विष्णू - प्रवीण पराडकर, रुद्र - अविनाश कामते, हनुमान - प्रसाद गवंडी, यम - सतीश मानकामे, ब्रम्हा - केतन आजगावकर, गणपती - केशव म्हाडगुत, देवी- प्रथमेश परब आदी कलाकार सहभागी झाले होते.
रंगभूषा व वेशभूषा तारक कांबळी, संकल्पना श्री दत्तमंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची होती. यावेळी शब्दांकन निवेदक महेश धामापूरकर, प्रभुदास आजगावकर व टोपीवाला हायस्कूल शिक्षकवृंद, मेस्त्री बंधू, विलास देऊलकर, सुशांत तायशेटे, ओरोसकर बंधू, गौरीश काजरेकर, अभय कदम आदींचे सहकार्य लाभले.