गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध, तालुक्यात तीन ग्रामपंचायतच्या १० जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 06:28 PM2020-12-31T18:28:05+5:302020-12-31T18:31:11+5:30
Kankavli Grampanchyat Election- कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली आहे.तर भिरवंडे ग्रामपंचायतच्या चार जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच या ग्रामपंचायतमधील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.तोंडवली- बावशी ग्रामपंचायतमध्ये सात जागांसाठी ३० अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील ११ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ४० अर्ज दाखल झाले आहेत.
कणकवली: कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली आहे.तर भिरवंडे ग्रामपंचायतच्या चार जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच या ग्रामपंचायतमधील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.तोंडवली- बावशी ग्रामपंचायतमध्ये सात जागांसाठी ३० अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यातील ११ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ४० अर्ज दाखल झाले आहेत.
कणकवली तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत . त्यातील गांधीनगर ग्रामपंचायतच्या सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले.त्यात प्रभाग १ मध्ये प्रसन्ना प्रशांत सावंत,तुषार भगवान सावंत,राजेंद्र रामचंद्र सावंत,प्रभाग २ मधून मंजुषा महादेव बोभाटे, विनिता दिनेश सावंत आणि प्रभाग ३ मधून मंगेश अनंत बोभाटे, सुनीता अनाजी सावंत या सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले . त्यांच्या विरोधात कोणाचेही अर्ज नसल्याने ही ग्रामपंचाय पूर्णतः बिनविरोध झाली आहे.याठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून ज्ञानेश पाताडे, सहाय्यक तनोज कळसुलकर यांनी काम पाहत आहेत.
तोंडवली -बावशी ग्रामपंचायतच्या सात जागांसाठी एकूण ३० अर्ज दाखल झाले आहेत.यात प्रभाग १ मधून दोन जागांसाठी ७, प्रभाग २ मधून तीन जागांसाठी १४ तर प्रभाग ३ मधून दोन जागांसाठी ९ अर्ज दाखल झाले आहेत.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रमोद पालकर यांनी काम पाहिले. भिरवंडे ग्रामपंचायतच्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातील प्रभाग क्रमांक १ मधील मिलिंद रुक्माजी पवार आणि सुजाता संतोष सावंत या बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत.
प्रभाग २ मध्ये एका जागेसाठी दोन तर दुसऱ्या सर्वसाधारण जागेसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग ३ मध्ये विष्णू धर्माजी डीचवलकर हे बिनविरोध झाले आहेत तर एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कैलास राऊत तर साहाय्यक संजय धुरी यांनी काम पाहिले. उमेदवारी अर्जाची छाननी गुरुवारी करण्यात येणार आहे.
कणकवली तहसील कार्यालयात भिरवंडे ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.