सिंधुदूर्ग क्लासिक २०१७ चा मानकरी गणेश सातार्डेकर
By Admin | Published: April 17, 2017 06:37 PM2017-04-17T18:37:01+5:302017-04-17T18:37:01+5:30
वेंगुर्लेत सातेरी व्यायाम शाळेचा उपक्रम :कुडाळचा वृषभ कांबळी ह्य सिंधुदूर्ग फिटनेस फिजिक
आॅनलाईन लोकमत
वेंगुलेर् , दि. १७ : श्री सातेरी व्यायाम शाळेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ह्यसिंधुदुर्ग क्लासिक २०१७ बॉडीबिल्डींगह्णचा मानकरी मालवण येथील गणेश सातार्डेकर ठरला. त्याला रोख तीन हजार, सन्मानचिन्ह व मानाचा किताब मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर सिंधुदुर्ग क्लासिक फिटनेस फिजिक २०१७ चा कुडाळ येथील वृषभ कांबळी हा मानकरी ठरला. त्याला रोख दोन हजार, सन्मानचिन्ह देण्यात आले.
वेंगुर्ले साई दरबार हॉल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पीस अॅण्ड केअर ग्रुप सोन्सूरकर फिटनेस शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने व सिंधुदुर्ग जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने व्यसनमुक्त अभियान अंतर्गत प्रथमच सिंधुदुर्ग क्लासिक २०१७ बॉडिबिल्डींग या जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या शरीरसौष्ठव स्पर्धा वेंगुर्लेत पार पडल्या. यास्पधेर्चे उद्घाटन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते झाले.
स्पधेर्चा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे
सिंधुदुर्ग क्लासिक २०१७ शरिरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश सातार्डेकर (आॅपटीमम फिटनेस मालवण), द्वितीय सुधीर हळदणकर (सुप्रिमो सावंतवाडी), तृतीय स्वप्नील जाधव (बॉडी टेंपल कणकवली), चौथा सौरभ वारंग (सुप्रिमो सावंतवाडी), पाचवा ओमकार गावकर (जे.डी. फिटनेस कुडाळ), सहावा विपुल करलकर (सिल्वा कुडाळ), सातवा युवराज आडारकर (वेंगुर्ले), आठवा लक्ष्मण जाधव (एस.आर.के. कणकवली), नववा संजय पार्सेकर (सावंतवाडी), दहावा धनंजय परब (सावंतवाडी).
विशेष पारितोषिक बेस्ट पोझर- ओमकार गावकर,
मोस्ट इम्प्रूव्हड बॉडीबिल्डर व बेस्ट अॅब सुधीर हळदनकर,
बेस्ट काप्स व बेस्ट थाईज- स्वप्नील जाधव,
बेस्ट चेस्ट-सौरभ वारंग,
बेस्ट ट्रायसेफ- विपुल करलकर,
बेस्ट बॅक- युवराज आडारकर,
बेस्ट बायसेफ- लक्ष्मण जाधव
सिंधुदुर्ग क्लासिक फिटनेस फिजिक प्रथम वृषभ कांबळी (जे.डी. कुडाळ), द्वितीय संतोष केरकर (सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ले), तृतीय पीटर फर्नांडिस (सातेरी व्यायाम शाळा), चौथा अमित देसाई (निअर अप कुडाळ), पाचवा नेल्सन मयेकर (सुप्रिमो सावंतवाडी), सहावा विशाल कसालकर (बॉडी टेम्पल कणकवली), सातवा मोहसिन शेख (जेडी कुडाळ), आठवा परशुराम कटीमनी (पावर हाऊस कणकवली), नववा शैलेश जाधव (पावर हाऊस कणकवली), दहावा वैभव मोये (जे.डी. कुडाळ), उगवतातारा सिध्देश साळगावकर सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ले यांना क्रमांक मिळविले. स्पधेर्साठी पंच म्हणून अमृत पाटील, भरत पाटील, संजय धुरे, मंगेश गावडे, विनय धुरत, विक्रांत हळदणकर यांनी काम पाहिले.