गॅस वितरणासंबंधी तक्रारी

By admin | Published: March 11, 2015 11:14 PM2015-03-11T23:14:54+5:302015-03-12T00:04:22+5:30

वेंगुर्लेत ग्राहक मेळावा : ‘जागो ग्राहक जागो’ अंतर्गत उपक्रम

Gas Distribution Complaints | गॅस वितरणासंबंधी तक्रारी

गॅस वितरणासंबंधी तक्रारी

Next

वेंगुर्ले : ‘जागो ग्राहक जागो’ अंतर्गत क्रिएटिव्ह ग्राहक मेळाव्यास मंगळवारी वेंगुर्लेवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्वच प्रतिनिधी व सर्वसामान्य वर्गाने गॅस वितरणासंबंधी अनेक तक्रारी दाखल केल्याने गॅस एजन्सी विरोधात लढा उभारण्याचे ठरविण्यात आले. ग्राहक मेळाव्याचे आयोजन प्रसन्ना देसाई यांनी बुधवारी केले. यावेळी व्यासपीठावर क्रिएटिव्ह उपभोक्ता (ग्राहक) संरक्षण समिती महाराष्ट्र अध्यक्ष विनोद पारकर, संस्थेचे प्रभारी व उपाध्यक्ष प्रशांत नाईक, दक्षिण पूर्व मुंबई जिल्हाध्यक्ष अमरजीत सिंह, युथ संस्थेचे श्रीनिवास गावडे, ग्राहक मंचच्या तालुका संघटक कीर्तीमंगल भगत उपस्थित होत्या. यावेळी ग्राहकांनी मांडलेल्या समस्या, ग्राहकांची होणारी फसवणूक, ग्राहक सरंक्षण कायदे व त्यांच्या तरतुदी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आजचा ग्राहक अनेक मार्गांनी शोषला जातो. त्यासाठी ग्राहकांनी जागृत होऊन एकजुटीने चळवळ उभी केली, तरच ग्राहक समाधानी जीवन जगेल, असे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष विनोद पारकर यांनी केले. तसेच सर्वांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. संस्थेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी प्रशांत नाईक यांनी ग्राहकांच्या शोषणाविरोधात प्रखरपणे लढा देऊन न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. या मेळाव्यास अ‍ॅड. प्रकाश बोवलेकर, भ्रष्टाचार विरोधी मंचच्या जिल्हाध्यक्ष अमिन शेख, रिक्षा संघटनेचे भाई मोर्जे, डॉ. आर. एम. परब, विमा प्रतिनिधी अण्णा गिरप, व्यापारी संघटनेचे संजय तानावडे, कुमार कामत, रमेश शेटये, प्रदीप वेंगुर्लेकर, विवेक कुबल, महेश परूळेकर, लाडू जाधव, तंबाखू मुक्त अभियानाचे किशोर सोन्सूरकर, प्रताप पावसकर, रफीक शेख, देवस्थान कमिटीचे रवींद्र परब, विलास दळवी, माजी उपनगराध्यक्ष विक्रम गावडे, सुहास गवंडक ळकर, माजी केंद्रप्रमुख आर. के. जाधव, भिवा जाधव, लवू तुळसकर, सुनील मठकर, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव आळवे, प्रा. ए. के. बिराजदार, संजय पाटील, भाजप तालुकाध्यक्ष साईप्रसाद नाईक, रवींद्र शिरसाट, उपेंद्र वालावलकर, विनय गोगटे, शरद मेस्त्री, पत्रकार सुरेश कौलगेकर, संजय मालवणकर, प्रदीप सावंत, मॅक्सी कार्डोज, सुरज सावंत, विविध क्षेत्रातील मान्यवर व जाणकार उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक खर्डेकर कॉलेजचे प्राध्यापक प्रकाश देसाई, आभार आयोजक प्रसन्ना देसाई यांनी मानले. (वार्ताहर)

पिळवणुकीबाबत झाली चर्चा
तालुक्यातील सर्व विभागातील प्रतिनिधी व ग्राहक वर्गाने गॅस एजन्सी विरोधात अनियमित गॅस वितरण व ग्राहकांना वितरकांकडून देण्यात येणारी वागणूक व सेवा या तक्रारी केल्याने या संस्थेमार्फत गॅस एजन्सी विरोधात लढा उभारण्याचे ठरविण्यात आले. तसेच अनेक व्यापाऱ्यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी केल्या. वजन माप तपासणी करणारे ठेकेदार-अधिकारी, त्याचप्रमाणे अन्नभेसळ अधिकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक याबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: Gas Distribution Complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.