सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कामाचा मोबदला स्पर्धेत गौतमी घावनळेकर प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:52 PM2017-12-06T13:52:26+5:302017-12-06T13:59:56+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेतलेल्या कामाचा मोबदला या स्पर्धेत आशा स्वंयसेविका गौतमी गौतम घावनळेकर-सुफल यांनी कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचा कुडाळच्या नगरसेविका सरोज जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेतलेल्या कामाचा मोबदला या स्पर्धेत आशा स्वंयसेविका गौतमी गौतम घावनळेकर-सुफल यांनी कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचा कुडाळच्या नगरसेविका सरोज जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आशा स्वंयसेविकांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा या उद्देशाने कामाचा मोबदला ही स्पर्धा जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक आलेल्या गौतमी घावनळेकर यांना आशा दिनाच्यावेळी कुडाळ आरोग्य विभागामार्फत गौरविण्यात आले होते.
गौतमी घावनळेकर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल नगरसेविका सरोज जाधव, कुडाळ ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास कुडाळकर, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील सुधीर कुडाळकर, दत्तप्रसाद जाधव, जनार्दन कुडाळकर, केतन कदम, किरण कुडाळकर, नीतेश कुडाळकर, हर्षल मालवणकर, साहिल कुडाळकर, सुजल कुडाळकर आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.