गावडे, प्रभू, झांट्ये प्रथम
By admin | Published: February 5, 2015 08:31 PM2015-02-05T20:31:15+5:302015-02-06T00:39:17+5:30
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर : भालचंद्र महाराज आश्रम शैक्षणिक मंडळातर्फे आयोजन
कणकवली : प. पू. भालचंद्र महाराज आश्रम शैक्षणिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. पूर्वमाध्यमिक परीक्षेत सावंतवाडी नं. २ शाळेचा अंबर नागेश गावडे आणि कुडाळ पडतेवाडी शाळेचा ऋग्वेद आशिष प्रभू (२६६ गुण), तर माध्यमिकमध्ये जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणचा आशिष अविनाश झांट्ये (२७० गुण) पहिला आला आहे. पूर्व माध्यमिकमध्ये संस्कृती सागर मिसाळ (टोपीवाला, मालवण) व सोहम सुहास सातोसकर (सावंतवाडी नं.२, २६० गुण) द्वितीय आणि प्रणव रघुनाथ कामत याने (२५८ गुण, शिरोडा नं.१) तृतीय क्रमांक मिळवला. माध्यमिकमध्ये श्रीराम सुनील भोगले (२५८ गुण, फोंडा हायस्कूल) द्वितीय आणि अमृतेश शामसुंदर पोकळे (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी) व अमेय दत्ताराम श्रृंगारे (२५० गुण, भंडारी हायस्कूल, मालवण) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. पूर्व माध्यमिकचे पहिल्या दहा क्रमांकातील विद्यार्थी पुढीलप्रमाणे- चिन्मय सदानंद गावकर (शिरोडा नं.१), आर्या प्रशांत मडव (न्यू इंग्लिश स्कूल जांभवडे), यश गुरुदत्त बिर्जे (सावंतवाडी नं. २), निकिता विजय प्रभूतेंडोलकर (कुडाळ पडतेवाडी), पार्थ शंतनू तेंडुलकर (सावंतवाडी नं. २), दीप बाळकृष्ण परब (कुडाळ पडतेवाडी), गौरांगी विश्वास धुरी (कराची इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ), प्रांजल भूपतसेन सावंत (कुडाळ, पडतेवाडी), दर्शन युवराज मांजरेकर (तळवडे नं. ८), कुणाल दीपक धामापूरकर (सोलगाव नं.३, राजापूर), ऊर्जा मिलिंद देसाई (कुडाळ, कुंभारवाडा), अनुजा दशरथ सावंत (सावंतवाडी नंं.२).
माध्यमिकमध्ये वेदांत विजय गावकर (वराडकर हायस्कूल, कट्टा), देवांग दशरथ सावंत (राणी पार्वतीदेवी, सावंतवाडी), श्रेया उमेश कुलकर्णी (शिरगाव हायस्कूल), ऋषिकेश गुरुनाथ भटगावकर (न्यू शिवाजी हायस्कूल पणदूर), सुरभी धोंडू परब (एस. एम. हायस्कूल कणकवली), तन्मय काशिनाथ पेडणेकर (टोपीवाला मालवण), वेदांत प्रभाकर गोसावी (फोंडा हायस्कूल), प्रथमेश अर्जुन घाडिगावकर (बोर्डवे नं. १), राधिका भवन मांजरेकर (कोर्ले धालवली हायस्कूल, देवगड). (प्रतिनिधी)
पूर्व माध्यमिकमध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये १८, तर माध्यमिकमध्ये १३ विद्यार्थी आले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव २१ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता येथील भालचंद्र महाराज आश्रमात आयोजित करण्यात आला आहे.