गेडाम नवे पोलीस अधीक्षक

By admin | Published: April 28, 2017 11:51 PM2017-04-28T23:51:25+5:302017-04-28T23:51:25+5:30

गेडाम नवे पोलीस अधीक्षक

GEDAM New Superintendent of Police | गेडाम नवे पोलीस अधीक्षक

गेडाम नवे पोलीस अधीक्षक

Next


सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची नागपूर येथे लोहमार्ग पोलीस खात्यात बदली करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गचे नूतन जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून आंबेजोगाई, बीड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले आय.पी.एस. दीक्षितकुमार अशोक गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. गावकर यांनी आपल्या दहा महिन्यांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या ‘दोन नंबर’धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत अवैध धंदेवायिकांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय शिंदे यांची डंपर आंदोलनानंतर बदली झाल्यावर २७ जून २०१६ मध्ये अमोघ गावकर यांची सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. आपल्या कर्र्तव्यात कठोर असलेले गावकर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात यश मिळविले होते. गावकर यांनी कोणताच गवगवा न करता जिल्ह्यातील अवैध धंदेवायिकांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे गावकर यांचा सर्वांनीच धसका घेतला होता. त्यांची बदली व्हावी, यासाठी चातकासारखी वाटही बरेचजण बघत होते.
गावकर यांची बदली झाली असल्याने त्यांच्या जागी आता बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले आय.पी.एस. दीक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नूतन जिल्हा पोलिसप्रमुखांची कार्यपद्धती
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे २०११ मध्ये आय.पी.एस झाले. बीड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अवैध धंदे व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांनी स्वत: पहाटे ५ वाजता डोंगर-दऱ्यामध्ये जाऊन तेथे असणाऱ्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून कारवाई केली आहे.
जनतेमधून नाराजी : कर्तव्यदक्ष अशी अल्पावधीत ओळख निर्माण करून अवैध धंद्यांना चाप लावून सर्वसामान्य जनतेच्या मनात जागा निर्माण करणारे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची नागपूर येथे बदली झाली आहे. गावकर यांची एका वर्षाच्या आत बदली झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: GEDAM New Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.