उत्तम घडण होण्यासाठी सर्वसामान्य जागरुकता महत्वाची : सुषमा तायशेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:35 AM2019-05-08T10:35:33+5:302019-05-08T10:37:14+5:30
तळेरे : काहीतरी करायची जिद्द असेल तर पुढील रस्ता आपोआपच मिळत जातो. त्यासाठी आजूबाजूला काय घडते याची उत्सुकता असली ...
तळेरे : काहीतरी करायची जिद्द असेल तर पुढील रस्ता आपोआपच मिळत जातो. त्यासाठी आजूबाजूला काय घडते याची उत्सुकता असली पाहिजे. सर्वसामान्य जागरूकताही त्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. त्यामुळेच तुमची घडण होत असते. समान विचारांचे मित्रपरिवार असतील तर कुटुंबापेक्षाही त्यांचे जास्त सहकार्य मिळते, त्यामुळेच तुम्ही अधिकाधिक पुढे जाऊ शकता, असे प्रतिपादन कायदा मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे यांनी तळेरे येथे केले. समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग आणि तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वयंसिध्दा महिला गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन रमाकांत वरुणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सुषमा तायशेटे व डॉ. उज्वला सराफ यांच्या हस्ते स्व. सुनील तळेकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत वरुणकर, कायदा मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे, डॉ. उज्वला सराफ, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, समानवता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी, स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अशोक मुद्राळे, विनय पावसकर, बापू महाडिक, दिलीप पाटील, नितीन तळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुषमा तायशेटे म्हणाल्या कि, आपल्याकडे प्रचंड हुशारी आहे, मात्र ती शालेय अभ्यासक्रमातच दिसून येते. मग पुढे का जात नाही? खूपच कमी मुल शासकीय सेवेत येतात. यासाठी समान विचारांचे मित्रपरिवार ठेवले पाहिजेत. कुटुंबापेक्षा त्यांचे सहकार्य लाखमोलाचे असते. आपल्याकडची मुले शासकीय सेवेत आली आणि भविष्यात त्यांना जिल्ह्यात सेवा करायची संधी मिळाली तर त्यामुळे आपल्या परीसराचाच विकास होऊ शकेल.
या सर्व गोष्टींसाठी सामान्य जागरुकता असली पाहिजे. त्यासाठी दैनंदिन पेपर वाचले पाहिजेत, अनेक वाहिन्यांवरील संवाद आणि चर्चासत्रे एकली पाहिजेत. असे सांगत या महिलांचा सत्कार आणि सन्मान न करता यासारख्या महिलांना आयुष्यात समर्थपणे उभे राहण्यासाठी समानवता प्रयत्न करणार आहे.
आपआपल्या व्यवसायात स्वत:ची वेगळी वाट निवडून त्यात येणा?्या असंख्य अडचणींवर मात करत स्वत:ला सिद्ध करणा?्या ह्यस्वयंसिध्दह्ण महिलांना स्वयंसिध्दा हा पुरस्कार सुषमा तायशेटे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
स्वयंसिध्द महिलांना स्वयंसिध्दा पुरस्काराने गौरव
यावेळी शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून दहा महिलांना स्वयंसिध्दा महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये रेश्मा डामरी-दाभोळकर (कणकवली), सौ. चैताली काणेकर (वागदे), डॉ. रुपाली वळंजू (कणकवली), रश्मी उपरकर (कणकवली), सायली राणे (तळेरे), श्रीमती संजोग नांदलसकर (तळेरे), राधिका खटावकर (तळेरे), रेश्मा तळेकर (तळेरे), अनुजा लवेकर (कासार्डे), श्रावणी मदभावे (नाधवडे) यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार विजेत्यान्मधून रेश्मा डामरी-दाभोळकर, राधिका खटावकर, श्रावणी मदभावे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश गोसावी तर आभार विनय पावसकर यांनी केले. या कार्यक्रमाला श्रावणी आणि मेधांश कम्प्युटरचे प्रशिक्षणार्थी आणि तळेरे परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.