नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 06:31 PM2021-07-28T18:31:31+5:302021-07-28T18:32:50+5:30

Shiv Sena Kankavli Sindhudurg : कणकवली नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्याना शहरातील जनता कंटाळली आहे. अशा या कारभार्‍यांना आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखविण्याचा निर्धार करा. तसेच नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा. असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले.

Get ready to throw Shiv Sena's saffron in Nagar Panchayat! | नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा !

 कणकवली येथे शिवसंपर्क अभियानात शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतुल रावराणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देनगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा !संदेश पारकर यांचे आवाहन ; कणकवली शहरात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

कणकवली : कणकवली नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्याना शहरातील जनता कंटाळली आहे. अशा या कारभार्‍यांना आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखविण्याचा निर्धार करा. तसेच नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा. असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले.

कणकवली जळकेवाडी येथील गुरव यांच्या निवासस्थानी शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर,शहर प्रमुख शेखर राणे,सुजित जाधव,प्रतीक्षा साटम,मीनल म्हसकर,नगरसेविका मानसी मुंज,तेजस राणे,भिवा परब,प्रसाद अंधारी,योगेश मुंज,अमित मयेकर,दिव्या साळगावकर आदी उपस्थित होते.

संदेश पारकर म्हणाले, नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद व दहशतीचा वापर केल्यामुळे सेनेचे ७ ते ८ उमेदवार काही मतांच्या फरकाने पराभूत झाले. या निवडणुकीत सेनेचा पराभव झाला म्हणून शहराच्या विकासाची जबाबदारी शिवसेनेने सोडली नाही. शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खासदार, आमदार फंडातून आणला. तसेच कोरोनाच्या काळात शिवसैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाग्रस्तांना मदत केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील असून शिवसैनिकांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेचा भगवा फडकवण्यासाठी आतापासून कामाला लागावे. सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती जनतेपर्यंच जावून सांगावी.

अतुल रावराणे म्हणाले,जेव्हा जेव्हा राज्यावर नैसर्गिक संकटे येतात त्यावेळी सर्वप्रथम जनतेच्या मदतीला बाळासाहेबांचा शिवसैनिक धावून जातो. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा आरोग्य यंत्रणा कमकुवत होती. ती सक्षम करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन ती सक्षम केली आहे. कोकणाला शिवसेनेने भरभरून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडणूक आणण्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासून कामाला लागावे. यावेळी श्री भैरी भवानी प्रतिष्ठानतर्फे व संदेश पारकर यांच्यातर्फे उपस्थितांना काजू कलम, छत्री व वह्यांचे वाटप करण्यात आले.
 

Web Title: Get ready to throw Shiv Sena's saffron in Nagar Panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.