आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवा
By admin | Published: February 16, 2015 09:58 PM2015-02-16T21:58:20+5:302015-02-16T23:12:00+5:30
संदेश सावंत : वरवडे येथे जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धेचा शुभारंभ
कणकवली : मुलांना क्रीडा विषयक सहकार्य देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तत्पर आहोत. कणकवलीत तालुक्यातील मुलांनी स्केटिंगमध्ये प्रावीण्य मिळवून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवावे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खेळाडूंना सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, वरवडे या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मुक्तानंद गवंडळकर, नगरसेवक अण्णा कोदे, उपाध्यक्ष संगीता बोडके, सचिव योगेश सामंत, मंजिरी खोत, अर्चना देसाई, सोनाली कुबडे, शैलेश नाईक, सचिन इंगवले, पी. एन. बोडके, वि. शं. पडते, आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम वरवडे येथे रविवारी आयोजित केला होता.रोलर स्केटिंग या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाबद्दल अद्याप जिल्ह्यात फारशी माहिती नाही. संस्थेमुळे खेळाडूंना आता व्यासपीठ मिळेल. याचा प्रचार, प्रसार जिल्ह्यात करून मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कलमठ येथे सुसज्ज गार्डन व २०० मीटरचा स्केटिंग ट्रॅक उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या फंडातून निधी दिला जाईल, असे सावंत यांनी यावेळी सांगितले.असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गवंडळकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा रोलर स्केटिंगच्या माध्यमातून छोटेसे रोपटे लावले आहे. सर्वांच्या सहकार्यातून याचा वटवृक्ष होऊ शकतो. येत्या २१ व २२ फेबु्रवारी रोजी ३ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलांसाठी ओरोस येथे डॉन बॉस्को शाळेत रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेशी संपर्क साधावा. यावेळी संदीप इंगवले व शैलेश नाईक यांनीही मार्गदर्शन केले. पी. एन. बोडके यांनी प्रास्ताविक, तर राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)+
विजेत्यांचा सत्कार
वरवडे येथील सिंधुदुर्ग जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी मुलांनी स्केटिंग डेमो प्रात्यक्षिक करून दाखवले. रो रेस व ब्लॅक बेल्ट मिळविलेल्या स्वप्निल तावडे, मिहिर शंकरदास, आशिष बेळेकर, आदेश हाटले, प्रतीक दळवी, नंदन शंकरदास, सोहम गांगण, आसावरी गांगण, हर्ष देसाई, दुर्वा कवटकर, प्रथम दळवी, रूद्रीक बोडके, अथर्व आंबेरकर, आदींंचा मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सत्कार करण्यात आला.