प्रियकराच्या भेटीसाठी विद्यार्थिनीची मुंबईकडे धाव

By Admin | Published: November 29, 2015 01:10 AM2015-11-29T01:10:25+5:302015-11-29T01:10:25+5:30

बार्देस-गोवा येथील विद्यार्थिनी : बांदा पोलिसांनी दिले पालकांच्या ताब्यात

The girl's run for the visit of a boyfriend to Mumbai | प्रियकराच्या भेटीसाठी विद्यार्थिनीची मुंबईकडे धाव

प्रियकराच्या भेटीसाठी विद्यार्थिनीची मुंबईकडे धाव

googlenewsNext

बांदा : मुंबई येथे आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी बार्देस-गोवा येथून एस.टी. बसने निघालेल्या शाळकरी विद्यार्थिनीला बांदा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी बसस्थानकातून ताब्यात घेतले. तिची चौकशी केल्यानंतर तिला पालकांच्या स्वाधीन केले.
ही युवती बार्देस-गोवा येथे दहावीत शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता ती शाळेत न जाता परस्पर (पान ८ वर)
वडील धास्तावलेले : वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने चार महिन्यांपूर्वी देखील अनिल याला भेटण्यासाठी वास्को गाठले होते. त्यानंतर मुलीच्या शनिवारच्या प्रकारानंतर ते पूर्णपणे धास्तावले होते. आपण गोवा येथील हॉटेलात कूक म्हणूून काम करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी मुलीचा व वडिलांचा जबाब नोंदविला व मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले.
म्हापसा बसस्थानकावरून पणजी-सावंतवाडी बसमध्ये बसली. तेथून ती सावंतवाडी येथे उतरली. तिला नेमके कुठे जायचे आहे हे न समजल्याने ती मुंबईला जाण्याच्या उद्देशाने सावंतवाडी-कुडासे बसमध्ये बसली व कुडासेचे तिकीट काढले. मात्र, ती मध्येच कुंब्रल येथे उतरण्याचा प्रयत्न करू लागल्याने वाहकाला तिच्याबाबत संशय आला. वाहकाने तिला कुडासे येथे न उतरविता बांदा येथे आणले. त्या विद्यार्थिनीची माहिती बांदा पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)


चौकट १
चिठ्ठीने पर्दाफाश
बांदा पोलिसांनी बसस्थानकावर जाऊन त्या शाळकरी मुलीला ताब्यात घेतले. तिला पोलीस ठाण्यात आणून तिची चौकशी करण्यात आली. मात्र, तिने पोलिसांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पोलिसांनी तिच्या दप्तराची झडती घेतली असता पोलिसांना त्यामध्ये हिंदीत ‘अनिल’ नामक युवकाला लिहिलेली चिठ्ठी आढळली. तसेच तिच्या मोबाईलवर पोलिसांसमक्षच अनिल नामक व्यक्ती सतत फोन करीत होती. पोलिसांनी त्याला खाकीच्या भाषेत बजाविताच त्याने फोन बंद केला. चिठ्ठीतील मजकुरानुसार ती अनिल याला भेटण्यासाठी मुंबईला जात असल्याचे पोलिसांना समजले. तसेच एका वहीवर वडिलांचा फोन नंबर सापडला. पोलिसांनी तिच्या वडिलांना फोन करून त्यांना बांदा पोलिसांत बोलावून घेतले.
चौकट २
 

Web Title: The girl's run for the visit of a boyfriend to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.