आंबा, काजू पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या; वैभव नाईकांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

By सुधीर राणे | Published: November 29, 2023 06:27 PM2023-11-29T18:27:19+5:302023-11-29T18:27:42+5:30

कणकवली: तांत्रिक अडचणीमुळे पिक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजू पिक विमा भरण्यासाठी ...

Give extension for payment of mango, cashew crop insurance, MLA Vaibhav Naik letter request to Agriculture Minister | आंबा, काजू पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या; वैभव नाईकांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

आंबा, काजू पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या; वैभव नाईकांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

कणकवली: तांत्रिक अडचणीमुळे पिक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजू पिक विमा भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे  कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, आंबा काजू पिक विमा (२०२३-२४) भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ ठेवण्यात आली आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी रखडल्या आहेत. शेतकरी बागायतदार यांना पिक विमा भरण्यासाठी ई पीक पाहणीमध्ये पिकांची नोंद करणे आवश्यक असल्याने बहुतांश शेतकरी पिक विमा योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. पिक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार यांना पिक विमा २०२३-२४ अंतर्गत पिक विमा भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागाणी वैभव नाईक यांनी केली आहे.

Web Title: Give extension for payment of mango, cashew crop insurance, MLA Vaibhav Naik letter request to Agriculture Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.