कोकण विकासासाठी शक्ती दे !
By admin | Published: February 13, 2015 09:04 PM2015-02-13T21:04:41+5:302015-02-13T23:00:29+5:30
विनायक राऊत : फणसगावच्या रवळनाथाला साकडे
फणसगांव : फणसगांव व विठ्ठलादेवी या दोन गावांचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी फणसगांव येथील श्री देव रवळनाथ मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी कोकणचा विकास करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे श्री देव रवळनाथाकडे करण्यात आले. यानंतर खासदार राऊत यांचा श्री देव रवळनाथ देवस्थान कमिटी फणसगांव यांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, विभागप्रमुख वैभव नर, पंचायत समितीचे सदस्य सुभाष कोकाटे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बिपीन तेंडुलकर, संतोष केसरकर, मनोहर गुरव, फणसगाव सरपंच उदय पाटील, उपसरपंच मंगेश गुरव, विठ्ठलादेवी तंटामुक्त समिती अध्यक्ष विश्राम नारकर, जुहू मुंबई येथील शाखाप्रमुख शरद प्रभू, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सर्वेश नारकर, हरिश्चंद्र पाटील, अनिल राणे, आदींसह कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सहदेव नारकर, कार्यवाह प्रभाकर नारकर, सिनिअर कॉलेजचे प्राचार्य विनायक जमदाडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. आर. जाधव, बाळा कुबल, आदींसह शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. (वार्ताहर)
दहा लाखांचा निधी देण्याचे आश्वासन
खासदार विनायक राऊत यांनी फणसगांव ज्युनिअर व सिनिअर कॉलेजला भेट दिली. फणसगांव पंचक्रोशी शिक्षण संस्था अत्यंत दुर्गम अशा भागात कार्यरत आहे.
संस्थेची आर्थिक बाजू मजबूत करून त्या उत्पन्नातून हे शैक्षणिक कार्य चालू ठेवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक सभागृह बांधण्यासाठी निधीची मागणी संस्थेच्यावतीने करण्यात
आली.
आपल्या स्थानिक विकास निधीमधून सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लाखांचा निधी देण्याचे आश्वासन राऊत यांनी यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.