सिंधुदुर्ग जिल्ह्याला " विशेष पर्यटन पॅकेज " द्या ! संदेश पारकर यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 05:34 PM2021-01-06T17:34:23+5:302021-01-06T17:35:43+5:30
tourism sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी विशेष पर्यटन पॅकेज द्या अशी मागणी कोकण सिंचन महामहामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई येथे भेट घेवून केली. त्यांना त्याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी विशेष पर्यटन पॅकेज द्या अशी मागणी कोकण सिंचन महामहामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्रीआदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई येथे भेट घेवून केली. त्यांना त्याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले.
या निवेदनात म्हटले आहे की , सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिकरित्या गोव्यापेक्षाही सुंदर असून येथील किल्ले , समुद्रकिनारे , आंबोलीसारखे हिलस्टेशन , अभयारण्य , विविध धबधबे , मासे , फळे , पारंपारिक कला , लाकडी खेळणी , मालवणी संस्कृती व भाषा हि जिल्ह्याची ओळख आणि संपत्ती आहे .
सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि येथे जास्तीतजास्त पर्यटक यावेत यासाठी समुद्र किनाऱ्यांवरील काही नियम व अटी शिथिल करणे आवश्यक आहे .
दरम्यान, जिल्ह्यातील संस्कृती जपण्यासाठी व स्थानिक युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने पर्यटनपूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन ठाकरे यांनी पारकर यांना दिले . आदित्य ठाकरे यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना संघटना वाढीच्या दृष्टीने देखील पारकर यांची यावेळी सविस्तर चर्चा केली