'सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, अन्यथा टोल नाका सुरू होवू देणार नाही'

By सुधीर राणे | Published: November 16, 2022 12:06 PM2022-11-16T12:06:03+5:302022-11-16T12:22:09+5:30

'टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून टोल नाका बंद पाडेल'

Give toll exemption to vehicles in Sindhudurga, otherwise the toll booth will not be allowed to open | 'सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, अन्यथा टोल नाका सुरू होवू देणार नाही'

'सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, अन्यथा टोल नाका सुरू होवू देणार नाही'

Next

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच वाहनांना ओसरगाव येथील टोल नाक्यावर कायमस्वरूपी टोल माफी मिळाली पाहिजे. राष्ट्रवादी पक्षाची सुरुवातीपासूनची ही भूमिका आहे. पुणे- नाशिक रोडवर ज्या पद्धतीने चाळकवाडी टोल नाका येथे त्या भागातील सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव टोलनाक्यावर संपूर्ण जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळाली पाहिजे. अन्यथा टोल नाका सुरू होऊ देणार नाही. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अबीद नाईक यांनी दिला.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वसुली करिता हालचाली जरी सुरू असल्या तरी  जनतेचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. येथील जनतेला पूर्णपणे टोल माफी मिळाली पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादीने यापूर्वी देखील वारंवार मांडली आहे. मात्र, काही जणांकडून केवळ श्रेयबाजी करता स्टंटबाजी केली जात आहे. मात्र राष्ट्रवादी कोणत्याही स्थितीत टोल वसुली करू देणार नाही. तसेच टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून टोल नाका बंद पाडेल असा इशारा देखील नाईक यांनी दिला.

Web Title: Give toll exemption to vehicles in Sindhudurga, otherwise the toll booth will not be allowed to open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.