जाखडी लोकनृत्याला ग्लोबल टच...

By admin | Published: August 6, 2015 11:41 PM2015-08-06T23:41:26+5:302015-08-06T23:41:26+5:30

गोरिवले करताहेत प्रयत्न : उर्जीतावस्था देण्यासाठी प्रयत्नांची गरज

Global touch to Jhandi dynasty ... | जाखडी लोकनृत्याला ग्लोबल टच...

जाखडी लोकनृत्याला ग्लोबल टच...

Next

दापोली : कोकणच्या जाखडी नृत्याची झलक दाखवून जाखडीला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध शाहीर भारदे गुरुजी व रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध शाहीर काशिनाथ गोरिवले या दोन नामवंत शाहिरांनी जाखडी नृत्याला चांगले दिवस आणण्यासाठी पन्हळेकाझी येथे जाखडी नृत्याचे चित्रीकरण करुन कॅसेट काढण्याचा निर्णय घेतला आहे.
‘महिला पुरुष शाहिरांनो का सोडल्यात लाजा, कुठे नेवून ठेवलाय, महाराष्ट्रातील शक्ती तुरा माझा’ अशा शाहिरीतून शाहीर भारदे गुरुजी यांनी कोकणातील लोककला जाखडी नृत्याला पुन्हा ग्लोबल टच देण्यासाठी जाखडी नृत्य चित्रपटात सुद्धा यापूर्वी झळकावले होते. आता सुद्धा चित्रपटाबरोबरच परदेशात स्टेज शो करायला मिळावेत व कोकणची लोककला सातासमुद्रापार जावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
पन्हाळेकाझी गावचे सुपुत्र प्रदिप जाधव यांचे प्रयत्नातून पन्हाळेकाझी झोलाईदेवी मंदिर, साई मंदिर, पन्हाळेकाझी लेण्या व पन्हाळेकाझीचा संपूर्ण परिसर चित्रीत होवून या गावातील निसर्ग सौंदर्य कॅसेटच्या रुपाने परदेशात जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Global touch to Jhandi dynasty ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.