गोवा बनावटीची दारू जप्त; युवक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 03:35 PM2019-12-18T15:35:31+5:302019-12-18T15:37:32+5:30
गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना तुळस-काजरमळी येथील अष्टविनायक ज्ञानदेव सावंत (२८) याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कारसह १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वेंगुर्ला : गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना तुळस-काजरमळी येथील अष्टविनायक ज्ञानदेव सावंत (२८) याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कारसह १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तुळस ते वेंगुर्ला दरम्यान सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तुळस घाटीत कारला गस्तीस असलेल्या पोलिसांनी थांबविले. गाडीची तपासणी केली असता चालक अष्टविनायक सावंत यांच्याकडे गोवा बनावटीच्या दारूचे १५ खोके सापडले.
गाडीसह १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार वेंगुर्ला पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीसनाईक धुरी, चोडणकर आदींनी सहभाग घेतला.