गोव्यातील युवतीचा मृतदेह आंबोली घाटात फेकला; प्रेमप्रकरणातून घडली घटना
By अनंत खं.जाधव | Published: September 1, 2023 05:41 PM2023-09-01T17:41:52+5:302023-09-01T17:42:59+5:30
हे प्रकरण २९ ऑगस्टला गोवा पर्वरी येथे घडले आहे प्रकाश चुंचवाड (२२) असे संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये अन्य एकाचा समावेश असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणने आहे. या दोघा आरोपींना आंबोली येथे आणण्यात आले आहे.
सावंतवाडी - पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील कामाशी शंकर उडपनव (28) या युवतीचा प्रियकराने खून करून मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवापोलिसांच्या तपासात शुक्रवारी उघड झाला. संशयित आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक आंबोली घाटात पोचले असून त्यांना तो मृतदेह सापडला असून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हे प्रकरण २९ ऑगस्टला गोवा पर्वरी येथे घडले आहे प्रकाश चुंचवाड (२२) असे संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये अन्य एकाचा समावेश असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणने आहे. या दोघा आरोपींना आंबोली येथे आणण्यात आले आहे.
कामाशी उडपनव ही तिच्या गोवा पर्वरी येथील फ्लॅटवर एकटी राहात असल्याची संधी साधून बुधवारी 30 ऑगस्ट ला दुपारच्या सुमारास आरोपीने चाकूने भोसकून खून केला होता. तो मृतदेह गाडीतून आणून त्याच दिवशी रात्री आंबोली घाटात फेकला होता. दरम्यान आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने २९ ऑगस्टला म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
त्यानुसार तपास म्हापसा पोलिसांनी केला. यात ताब्यात घेण्यात आलेल्या प्रकाश याने युवतीचा खून केल्याची कबुली दिली . त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन गोवा पोलिसांचे एक पथक शुक्रवार आंबोली येथे दाखल झाले आहे.
त्यानंतर घाटात शोध मोहीम राबविण्यात आली असून हा मृतदेह खोल दरीत तिचा मृत्यू दिसून आला मात्र आंबोली घाटात मोठ्याप्रमाणात पाऊस असल्याने मृतदेह वर काढण्यात अडचणी येत आहेत.
सावंतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह दोन दिवसापूर्वीच टाकण्यात आला आहे.मृतदेह मिळाला आहे.यात आरोपीला अन्य एका त्याच्या मित्राने सहाय्य केले असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान हा गुन्हा गोवा येथे दाखल झाला असल्याने गोवा पोलिस सर्व सोपस्कार हे तिकडेच करणार असल्याचे पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांनी सांगितले तसेच मृतदेहाची उत्तरीय तपासणी ही गोवा बांबुळी येथे करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.